आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला खुनी समजू नका हो ; स्त्रीरोग तज्ज्ञांचा आयुक्तांकडे टाहो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सोनोग्राफी सेंटर सील करण्याच्या मोहिमेत येथील स्त्रीरोगतज्ज्ञ स्त्री भ्रूणहत्या करतात, असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. स्त्री भ्रूणहत्या करणार्‍या डॉक्टर्सना जरूर पकडा. त्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याची आमचीही तयारी आहे, पण आम्हाला एकदम खुनी समजू नका, अशा शब्दांत शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे टाहो फोडला.
सोनोग्राफी सेंटर बंद ठेवल्यानंतर औरंगाबाद ओबेस्टिक अँड गायनॉकलॉजिकल सोसायटीच्या प्रतिनिधींनी डॉ. भापकर यांची भेट घेतली. त्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठीही सूचना करण्यात आली. यात अध्यक्ष डॉ. अजय माने, माजी अध्यक्ष राजेंद्र परदेशी, डॉ. पायल चौबे यांचा समावेश होता. गरजू रुग्णांची हेळसांड होत असल्यामुळे संघटनेने बंद मागे घेण्यात यावा, असे आवाहन डॉ. भापकर यांनी केले.
संघटनेच्या काही सूचना - खासगी गर्भपात केंद्रासाठी फक्त दहा आठवड्यांपर्यंतच सोनोग्राफी करण्याची परवानगी द्यावी, 11 ते 20 आठवड्यांचे गर्भ काढून टाकणे गरजेचे असल्यास शासनाकडून परवानगी घ्यावी. आवश्यक ती प्रमाणपत्रे अनिवार्य करण्यात यावी, गर्भवती मातांना सरकारी रुग्णालयात प्राथमिक तपासणी सक्तीची करावी. ओळखपत्र द्यावे. प्रसूतीपर्यंत हे ओळखपत्र अनिवार्य असावे.