आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील पर्यटनाचा विकास करा टुरिझम प्रमोटर्स गिल्डची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील असुविधांमुळे पर्यटनाचे मोठे नुकसान झाले असून पर्यटननगरीचा विकास करून आवश्यक पायाभूत सुविधा लवकर द्याव्यात, अशी मागणी केंद्रीय दळणवळणमंत्री अशोक गजपती राजू आणि पर्यटनमंत्री श्रीपाद नायक यांच्याकडे करण्यात आली आहे.

इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे दिल्लीत नुकतेच वार्षिक अधिवेशन झाले. त्या वेळी त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले असून त्यांच्यासमवेत पर्यटन विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
राजस्थानशी जोडणारी हवाई वाहतूक पूर्ववत सुरू करा, विविध कंपन्यांची विमाने औरंगाबादेत थांबण्यासाठी सुविधा देण्यात याव्यात, बुद्धिस्ट सर्किटमध्ये औरंगाबादचाही समावेश करण्यात यावा, पर्यटनासंदर्भात आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात औरंगाबादचा समावेश करण्यात यावा, दौलताबाद आणि मकबरा येथे साउंड व लाइटची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या त्यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात सुभाष गोयल, राजीव कोहली, जसवंतसिंग, निर्मल त्रिवेदी, श्रीकांत जोगदंड आदींचा समावेश होता.