आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'समांतर'ने परस्पर खाते बदलले, वसूल रकमेतही सव्वा कोटीची तफावत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरने पाणीपट्टीची रक्कम आयडीबीआय बँकेत मनपाच्या नावे भरण्याचे ठरले असताना कंपनीने मनपाला कल्पनाही देता अॅक्सिस बँकेत खाते सुरू करून त्यात सगळा भरणा केला जात आहे. तसेच सप्टेंबर १४ ते डिसेंबर १५ या काळातील ग्राहकांकडून वसूल केलेली रक्कम मनपाकडे कंपनीने वसूल रकमेतील हिश्शाची मागणी करताना दिलेली आकडेवारी यात तब्बल कोटी २० लाख रुपयांची तफावत आढळून आली आहे.
मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केलेल्या आॅडिटमध्ये हे प्रकार उघडकीस आले आहेत. कहर म्हणजे वसुलीची रक्कम भरणा करण्यासाठी एका खासगी एजन्सीला नेमण्यात आले असून या कंपनीलाही मनपालाच पैसे द्यावे लागत आहेत. मनपाने या सीएमएस कंपनीला मागच्या १५ महिन्यांच्या कालावधीत लाख २८ हजार रुपये अदा केले आहेत. ही रक्कम देणे नियमबाह्य असून ती त्वरित मनपाच्या खात्यात जमा करावी, असे लेखा परीक्षणात म्हटले आहे. अॅक्सिस बँकेतून पाणीपट्टीची वसूल जमा रक्कम आयडीबीआय बँकेत उशिरा जमा होत असल्याने या रकमेवरील व्याज मनपाला मिळत नाही. त्यामुळे औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीने सप्टेंबर १४ ते डिसेंबर १५ या कालावधीतील फरकाची १२ लाख ९८ हजार रु. एवढी रक्कम मनपाच्या खात्यात भरावी, असेही त्यात म्हटले आहे.

वसुलीतही घोळ : कंपनीनेवसूल केलेल्या पावत्यांत थकीत पाणीपट्टीचा उल्लेख करणे कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. पण येथेही कंपनीने चलाखी दाखवत पावत्यांवर कोणत्या कालावधीची थकबाकी आहे याचा उल्लेखच केलेला नाही. ही बाब मनपाचे आर्थिक नुकसान करणारी असल्याचा शेराही अहवालात आहे.
बातम्या आणखी आहेत...