आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरराष्ट्रीय स्पर्धेत अाैरंगाबादच्या खेळाडूंचे यश, प्रशिक्षकांच्या साधनेला साेनेरी चमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - प्रशिक्षकांच्या अनमाेल मार्गदर्शनामुळे गत दशकापासून अाैरंगाबादचे खेळाडू अांतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवत अाहेत.  यामागे अाैरंगाबादच्या तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे माेठे याेगदान अाहे. त्यामुळे या खेळाडूंना यशाचा पल्लाही यशस्वीपणे गाठता अाला. यामध्ये अांतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवेसह युवा धावपटू राशी जखाटे, फुटबाॅलपटू साैरभ रामटेके, राष्ट्रीय हाॅकीपटू पूनम, फुटबाॅलपटू सुरुताईसारख्या प्रतिभावंत युवा खेळाडूंचा समावेश अाहे. प्रशिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या खेळाडूंनी  चमक दाखवण्याची संधी मिळाली.

प्रतिभावंत हाॅकी, फुटबाॅलपटू घडवण्यासाठी अहाेरात्र मेहनत  
ज्ञानदीप शाळेत शिक्षक असलेल्या श्यामसुंदर भालेराव यांनी हाॅकी अाणि फुटबाॅलसाठी अापल्याला वाहूनच घेतले अाहे. त्यामुळे गरीब अाणि हाेतकरू प्रतिभावंतांना त्यांच्या रूपाने चांगला गुरू मिळाला. त्यांच्या अनमाेल मार्गदर्शनाखाली अातापर्यंत ७० राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. यात ३५ हाॅकी अाणि ३५ फुटबाॅलपटूंचा समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...