आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: अट्टल घरफोड्या कल्ल्याने दिली 18 तोळे सोने चोरल्याची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्ल्या ऊर्फ कलीम खान याने पोलिस कोठडीत दहा घरफोड्या करून १८ तोळे सोने चोरल्याची कबुली दिली. - Divya Marathi
कल्ल्या ऊर्फ कलीम खान याने पोलिस कोठडीत दहा घरफोड्या करून १८ तोळे सोने चोरल्याची कबुली दिली.
औरंगाबाद: मागील अनेक वर्षांपासून शहरात घरफोड्या करून पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या कल्ल्या ऊर्फ कलीम खान शबीर खान (३१, रा. मुरलीधरनगर, उस्मानपुरा) याने पोलिस कोठडीत तब्बल दहा घरफोड्या करून १८ तोळे सोने चोरल्याची कबुली दिली. औरंगाबाद, परभणी, आष्टीसह इतर तालुक्यांतील सोनारांना विकले ५ लाख ४५ हजार ९०० रुपयांचे सोने एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली. 
 
कल्ल्यावर आतापर्यंत ३६ घरफोड्या, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो पोलिसांच्या तावडीतून न्यायालयाच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला हाेता. उस्मानपुरा पोलिसांनी परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जून रोजी त्याला अटक केली होती. यापूर्वी सुनावलेल्या कोठडीत तो किरकोळ घरफोड्या, दोन किंवा तीनपेक्षा अधिक घरफोड्याची कबुली देत नव्हता, परंतु या वेळेस उस्मानपुरा परिसरात केलेल्या दहा घरफोड्यांची एका दुचाकी चोरीची उकल करून चोरलेला सर्व ऐवज हस्तगत करण्यात उस्मानपुरा पोलिसांना यश आले. 
 
 
यांचे फोडले होते घर 
स्मिता खरात (रा. एकनाथनगर), सुनील राजगिरे (रा. एकनाथनगर), अजय पारखे (रा. प्रतापनगर), मनोरमा यादव (रा. ज्योतीनगर), लताबाई ठाकूर (रा. देवानगरी, शहानूरवाडी), उषा मोदी (रा. दशमेशनगर), सतीश शर्मा (रा. एकनाथनगर), ज्ञानेश्वर वखरे आणि देवदास तंगडपल्ली (दोघेही रा. रेल्वे क्वॉर्टर, रेल्वे स्टेशन) यांची घरे फोडून कल्ल्याने सोने लंपास केले होते. 
बातम्या आणखी आहेत...