आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाची बहार, दसऱ्याला 3 हजार कोटींची उलाढाल, औरंगाबादेतील नोकरदार वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्याचार वर्षांपासून दुष्काळाशी लढणाऱ्या मराठवाड्यासह औरंगाबादेत यंदा पावसाने बहार आणली. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर औरंगाबादच्या बाजारपेठेत कमीत कमी तीन हजार कोटींची उलाढाल झाली, असे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल, संगणक आणि घरांच्या बाजारात तुफान तेजी आली. मात्र, ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अजूनही शेतीच्या कामात गुंतला आहे. त्याच्या हातात दिवाळीच्या सुमारास अपेक्षित रक्कम येईल आणि तो खरेदीसाठी बाजारात येईल, असा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेली चार वर्षे मराठवाड्यात दुष्काळाचे संकट होते. त्यामुळे गेल्या वर्षी दसऱ्याला केवळ १५ ते २० टक्के शहरी वर्ग बाजारात आला होता. त्यानेही त्याच्या अत्यंत गरजेपुरतीच खरेदी केली. यंदा खरेदीदारांचे प्रमाण ५० टक्क्यांवर गेलेच. शिवाय प्रत्येकाने सढळ हाताने खरेदी केली. त्यामुळेच बाजाराने उसळी मारली. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन या ऑनलाइन खरेदी व्यवहारातील उलाढाल किमान ३०० कोटींची झाली. मोबाइल विक्री १२० टक्क्यांनी वाढली. ८० टक्के लोकांनी १५ ते २० हजार रुपये किमतीचे मोबाइल खरेदी केले. सिडको कॅनॉट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे म्हणाले की, यंदा मोबाइलची विक्रमी विक्री झाली आहे. ते १० लाख रुपये किमतीच्या २०० चारचाकी आणि ८० हजार ते एक लाख रुपयांच्या २५०० दुचाकी मंगळवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत विक्री झाल्या होत्या. अनेक दालनांसमोर वाहन नेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यावरून उसळीचा अंदाज येऊ शकतो.

नवरात्राच्या पहिल्या माळेपासून यंदा दसऱ्याचा बाजार तेजीत होणार असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. तो ग्राहकांनी खरा ठरवला. गेल्या वर्षी कपडा बाजारात खूपच शांतता होती. ज्यांच्या घरी विवाह समारंभ आहेत, अशीच मंडळी कपडा बाजारात आली होती. यंदा औरंगाबादेत राहणाऱ्यांपैकी निम्म्या कुटुंबांनी किमान दोन सदस्यांनी कपडा खरेदी केली आहे. व्यापाऱ्यांनी आणलेल्या मालातील ३५ टक्के कपडा विकला गेला. इलेक्ट्राॅनिक बाजारातही अशीच तेजी होती. ४० ते ४५ टक्के वस्तू ग्राहकांनी खरेदी केल्या.
इलेक्ट्रॉनिक्स चारचाकी मोबाइल
यंदा पावसानेकमाल केली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या वाहनांची जोरदार विक्री झाली आहे. दिवाळीत आणखी विक्री वाढेल, असे दिसते.
- सतीश लोढा, संचालक, सतीश मोटर्स
सोन्याचा भाव घसरल्याने मोठी खरेदी...
सोन्याचे भाव गेल्या तीन ते चार दिवसांत एक हजार रुपयांनी घसरल्याने मोठी उलाढाल झाली. सोन्याच्या मण्यांपासून ते २४ कॅरेटची बिस्किटे, चांदीची ताटे, वाट्या ग्राहकांनी घेतल्या. जालना रोडवरील एका दुकानात दागिने खरेदी करताना ग्राहक.
वाहन बाजारात तेजी
गेल्यावर्षीच्यातुलनेत यंदा दुचाकी, चारचाकींची विक्री किमान ३० टक्क्यांनी वाढली. ग्रामीण भागातील ग्राहकांची पहिली पसंती वाहन खरेदीलाच होती.
- अतुलशहा, तज्ज्ञ, वाहन बाजार

बळीराजा कमीच
यंदापावसानेबहार आणली. पण पीक, धान्य, डाळीच्या विक्रीचा पैसा अद्याप हातात पडला नसल्याने बाजारपेठेत बळीराजा तुलनेने अत्यंत कमी होता.
- अजयशहा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ
बातम्या आणखी आहेत...