आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Corporation Alert : Water Tank Chacke By Officers

औरंगाबद महापालिका झाली जागा : जलकुंभांवर अधिकार्‍यांची तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डीबी स्टारने आपल्या वृत्तात गळके टँकर, टँकरचे उघडे झाकन, पाणी नेण्याच्या नोंदीच नसणे, पाणी भरताना होणारी नासाडी यावर प्रकाश टाकला. त्यावर कारवाई करत गळक्या टँकरची पाहणी आणि झाकड लावण्याचे आदेश देण्यात आले. जलकुंभांवर खास नळ्या लावण्यात आल्या. पाण्यावर फुकटचा डल्ला मारणार्‍या नेतेगिरीला लगाम लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

सीसीटीव्ही बसवणार
डीबी स्टारने या महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर मी तत्काळ कार्यकारी अभियंत्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. यापुढे असे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे जलकुंभांवर सीसीटीव्ही बसवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे हे प्रकार थांबतील.
हर्षदीप कांबळे, आयुक्त, मनपा
तपासणी केली
आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे मी कर्मचार्‍यांसह कोटला कॉलनीतील जलकुंभाची पाहणी केली. सकाळपासून तीन लोकांनी टँकर भरून नेले. त्यांच्या पावत्या व नोंदीही तपासल्या. शहरात विविध 25 ठिकाणच्या नोंदी तपासल्या. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील.
कार्यकारी अभियंता, मनपा