आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेतील फाइल गहाळ प्रकरणी गुन्हे दाखल करणार - मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेतील महत्त्वाच्या फाइल गहाळ प्रकरणात दोषी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत दिले. आमदार सतीश चव्हाण यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
नगररचना विभागातून तीन हजार फाइल गहाळ असल्याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे खरे आहे का, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, संचिकांचे लेखापरीक्षण करण्यात आले असून अभिलेख कक्षात 2 हजार 837 फाइल आढळून आल्या आहेत. त्यापैकी 885 फाइल कर्मचार्‍यांनी अभिलेख कक्षातून काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. अन्य फाइल अशाच कोठल्यातरी गठ्ठय़ात असण्याची शक्यता आहे.
त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू असून फाइल न सापडल्यास दोषी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात येतील. या प्रकरणात महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी गुंतलेले आहेत. त्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्यामुळे ते अधिकारी धास्तावले आहेत.