आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना, भाजप, काँग्रेसचे बंडखोर झाले विजयी; अपक्ष सांगा कुणाचे ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काल झालेल्या मतमोजणीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष तसेच काँग्रेसचे प्रत्येकी चार बंडखोर अर्थात अपक्ष विजयी झाले. तरीही हे अपक्ष आता कुणाचे हे कुणीही सांगू शकत नाही. अनपेक्षितपणे १७ अपक्ष विजयी झाले आहेत. विजयानंतर अपक्ष हे पूर्वीच्याच पक्षात परततात, असा अनुभव असला तरी गजानन बारवाल, सत्यभामा शिंदेंसह अनेकांनी या वेळी वेगळी वाट निवडल्याचे दिसून येते.
एमआयएममुळे थेट मतविभाजन होईल अन् अपक्षांची संख्या कमी राहील, असा अनेक राजकीय तज्ज्ञांचा कयास होता. प्रत्यक्षात गतवेळपेक्षाही जास्त अपक्ष या वेळी विजयी झाले. यात शिवसेना, भाजप तसेच काँग्रेस या तीन पक्षांचे प्रत्येकी चार उमेदवार आहेत. काँग्रेसचे असलेले काही जण मधल्या काळात एमआयएममध्येही जाऊन आले होते. उमेदवारी मिळाल्याने ते अपक्ष म्हणून लढले अन् थेट महानगरपालिकेत पोहोचले. परंतु ही मंडळी आता कोणत्या पक्षासोबत जाणार, याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.

महापौरपद मिळवण्यासाठी युतीला किमान बंडखोर किंवा अपक्षांची गरज आहे. ते त्यांना मिळतील हे जगजाहीर आहे. मात्र तरीही अपक्ष कोणत्या पारड्यात जातात हे समजू शकत नाही.
गुलमंडीवरून निवडून आलेले राजू तनवाणी हे भाजपसोबत जातील, हे स्पष्ट आहे.
नागेश्वरवाडीच्या कीर्ती शिंदे गतवेळी युतीसोबत होत्या, या वेळीही त्या युतीला पाठिंबा देतील, असे दिसते. बेगमपुऱ्यातून विजयी झालेले ज्ञानोबा जाधव हेदेखील भाजपसोबत जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे युतीला महापौरपद मिळवणे सोपे आहे.

काँग्रेसचे बंडखोर निवडून आले असले तरी ते पुन्हा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता नाही. रूपचंद वाघमारे (एकतानगर) यांनीही गतवेळी युतीलाच पाठिंबा दिला होता. या वेळी ते वेगळा मार्ग निवडतील, अशी शक्यता नाही. ज्योती अभंग या मूळ भाजपच्या आहेत. त्यामुळेही त्याही भाजपसोबत जातील, अशी चिन्हे आहेत. एकूणच अपक्ष हे युतीच्याच बाजूने शिरण्याची शक्यता अधिक आहे.

बारवाल नाराज

माजी महापौर गजानन बारवाल हे यापूर्वी चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. परंतु या निवडणुकीत त्यांना खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुद्दाम डावलले. तरीही ते अपक्ष म्हणून लढले अन् विजयी झाले. विजयानंतर त्यांनी शिवसेनेसोबत जाण्यास नकार दिला. भाजपबरोबर जाईन पण सेना नाहीच, असे त्यांनी जाहीर केले. शिवसेनेनंतर काँग्रेसकडून नगरसेवक झालेल्या सत्यभामा शिंदे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये गेल्या होत्या. त्यांचे पती दामोदर शिंदे यांना भाजपने उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे ते पुन्हा अपक्ष लढले. आता ते भाजपसोबत जाण्यास राजी नाहीत.

१] रूपचंदवाघमारे- एकतानगर- अपक्ष
२]ज्योतीअभंग- चेतनानगर, रोजाबाग- भाजप
३]ज्ञानोबाजाधव- बेगमपुरा- शिवसेना-
४]आशानिकाळजे- भीमनगर (उत्तर)- अपक्ष
५]गोकुळसिंगमलके नारेगाव- काँग्रेस
६]सुरेखासानप- नारेगाव, ब्रिजवाडी- शिवसेना
७]अजीजअहमद- शरीफ कॉलनी, काँग्रेस
८]खातिजाकुरेशी- कैसर कॉलनी- काँग्रेस
९]यशश्रीबखारिया- राजाबाजार- शिवसेना
१०]राजूतनवाणी- गुलमंडी- भाजप
११]कीर्तीशिंदे- नागेश्वरवाडी- अपक्ष
१२]जोहराबीनासेर खान- सिल्लेखाना- शहर प्रगती आघाडी
१३]गजाननबारवाल- पदमपुरा- शिवसेना
१४]सत्यभामाशिंदे- ठाकरेनगर- भाजप
१५]विमलकांबळे - कांचनवाडी- काँग्रेस-अपक्ष
१६]शोभाबुरांडे- देवानगरी- भाजप
१७]स्मिताघोगरे- मयूरबन कॉलनी- शिवसेना