आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Corporation Rain Har Wasting Is Helpful For City People

मनपाने वॉटर हार्वेस्टिंग केल्यास शहरवासीयांना मिळेल प्रेरणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्या मालकीच्या शहरात 154 पेक्षा अधिक इमारती आहेत. यापैकी एकाही इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. त्यामुळे दरवर्षी 28 द. ल. लिटर पाणी वाहून जात आहे. याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्येक कार्यालयावर वॉटर हार्वेस्टिंग केल्यास जलपुनर्भरण होईल. शहरवासीयांना प्रेरणा मिळून वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी लोक स्वत: पुढाकार घेतील, असा विश्वास विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

काय म्हणतात पदाधिकारी ?
- किमान मनपाच्या कार्यालयावर तरी रेन वॉटर हार्वेस्टिंग व्हावे, यासाठी आम्ही सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करतो, अर्थसंकल्पात निधीच्या खर्चाची तरतूद करतो; पण मनपा प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही. गिरजाराम हाळनोर, नगरसेवक, ज्योतीनगर.

मार्गदर्शक तत्त्वांची अवहेलना
- शासन निर्णयाप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्या तत्त्वानुसार मनपाने वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक होते. समीर राजूरकर, नगरसेवक, अपक्ष.