आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खुलताबाद येथील दर्ग्यास भेट देण्यासाठी हैदराबादहून चिकलठाणा विमानतळावर उतरण्याची परवानगी मागणारी खासदार असदुद्दीन ओवेसींची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

पोलिस आयुक्तांनी 144 कलमान्वये खासदार ओवेसींना शहरात प्रवेशबंदी केली होती. खुलताबाद येथे 12 फेब्रुवारीला जाण्यासाठी दोन दिवसांची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी खंडपीठात दाखल केली होती. ओवेसींनी 12 फेब्रुवारीस विमानतळावर येण्याची व 13 फेब्रुवारीला मुंबईला जाण्याची परवानगी मागितली होती. यासाठी 8 फेब्रुवारीस याचिका दाखल करण्यात आली होती.

देशात कोठेही जाण्याचा भारतीयास अधिकार असल्याचे ओवेसींच्या वतीने अ‍ॅड. काझी यांनी सांगितले. यावर सहायक सरकारी वकील एस. के. तांबे यांनी ओवेसींच्या शहरातील प्रवेशास हरकत घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेतला. दरम्यान, सभेच्या परवानगीसाठी दाखल अर्जावर 20 फेब्रुवारीला सुनावणी होत आहे.