आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकही तक्रार नाही; अधिकारी चांगले की त्यांचे ‘मॅनेजमेंट’? पोलिस आयुक्तांचा चिमटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित लोकसंमेलनासाठी पोलिस आयुक्त यशस्वी यादव गुरुवारी हर्सूल पोलिस ठाण्यात आले. मात्र, एकाचीही तक्रार आली नसल्याचे कळताच त्यांना धक्काच बसला. यावर “या ठाण्याचे पोलिस अधिकारी चांगले आहेत की त्यांचे ‘मॅनेजमेंट’, असा चिमटा त्यांनी काढला. हाच प्रश्न समोर बसलेल्या नागरिकांनाही विचारला. पण, अधिकारी चांगलेच आहेत, असे त्यांनी एकसुरात सांगताच आयुक्तांनी शांत हसून संमिश्र प्रतिक्रिया दिली. 
 
हर्सूल पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांसाठी गुरुवारी लोकसंमेलन आयोजित करण्यात आले होते. लोकांच्या समस्या ऐकणे, शक्य त्या तत्काळ निकाली काढणे, या उद्देशाने यादव यांनी विविध पोलिस ठाण्यांत लोकसंमेलने घेतली. आत्तापर्यंत सिटी चौक, एमआयडीसी सिडको, बेगमपुरा, सातारा, एमआयडीसी वाळूज, छावणी, वाळूज पोलिस ठाण्यात संमेलन पार पडले आहे. गणपती, ईदमुळे मध्यंतरी संमेलने थांबवली होती. 
 
दरम्यान, अशा संमेलनापूर्वी संबंधित पोलिस ठाण्यात आधीच तक्रारदारांची यादी तयार केली जाते. त्यानंतर उपस्थितांमधून चार ते पाच तक्रारी ऐकल्या जातात. हर्सूल ठाण्यात आठ जणांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. परंतु, आमचे समाधान झाले आहे, पोलिसांनी खूप मदत केली, असे सांगत संमेलनादरम्यान सर्वच तक्रारदारांनी अधिकाऱ्यांचे गुणगान सुरू केले. आयुक्तांनी यादीवर नजर फिरवून ‘अधिकारीचांगलेकी त्यांचे मॅनेजमेंट’, असा टोला लगावला. यावर उपस्थितांत हशा पिकला. या वेळी उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आणि निरीक्षक विवेक सराफ उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...