आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटाका आग प्रकरणातील दोषींना तिळमात्र झळ नाही, दोषी पदाधिकारी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हापरिषद मैदानावरील फटाक्यांच्या दुकानाला २९ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल २२ दिवस लोटले. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. संघटनेचे पदाधिकारी विलास खंडेलवाल हे पसार असून त्यांना अटक केल्याशिवाय पुढील कारवाई करता येणार नाही. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

पंधरा दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी फटाका आग प्रकरणातील दोषींना लवकरच अटक करू, अशी माहिती पत्रकारांना दिली होती. मात्र गुन्हा नोंदवून तब्बल २२ दिवस उलटले. मात्र अद्याप पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. सहा ऑक्टोबर रोजी खंडेलवाल यांच्यासह औरंगाबाद आणि संभाजीनगर फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा तपास करीत आहे. या दोन्ही संघटनांत शहरातील माजी आमदार इतर बड्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

प्रशासकीय पातळीवर चालढकल :
शहरातलाधोक्यात टाकणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांसह महसूल विभागही चालढकल करत असल्याचे दिसत आहे. घटनेला महिना उलटून गेला तरी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या घटनेचा अहवाल पोहोचला नाही. अपर जिल्हाधिकारी पी. एल सोरमारे हा अहवाल तयार करीत आहेत, तर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशीचा अहवालही आयुक्तांकडे सादर झालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...