आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांची अशीही शक्कल... घरात साप सोडून लुटला 66 हजारांचा ऐवज!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - घरात साप सोडून चोरट्यांनी लहान मुलाला भीती दाखवून सोन्या-चादींच्या दागिन्यांसह सुमारे 66 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (20 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली

सिडकोच्या वाळूज महानगर-2 मधील बालाजी पावडे हे पत्नीसमवेत गुरुवारी रात्री कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा मुलगा ओमकार हा टीव्ही बघत होता. त्याला व्हरंड्यात साप दिसल्यामुळे त्याने घराबाहेर धूम ठोकली. शेजारी राहणार्‍यांना त्याने ही सर्व माहिती दिली. तेव्हा घराची सर्व दारे उघडीच होती. त्यानंतर पावडे कुटुंबीय घरी आले. त्यांनी सर्पमित्राला बोलावल्यानंतर त्याने साप पकडून नेला. या घडामोडीनंतर घरात चोरी झाल्याचे पावडे कुटुंबीयांच्या लक्षात आले. चोरट्यांनी पाटातील चोर कप्प्यातून 61 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन कॅमेरे, दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा 66 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनीच घरात साप सोडून पावडे यांच्या मुलाला घाबरवून चोरी केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.