आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या, नशेत फास लावून घेतल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपातील सफाई कर्मचारी राजेश भीमराव वाघमारे (४०, चौधरी कॉलनी, प्लॉट नं. ४, चिकलठाणा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेश यांनी अति मद्यप्राशन करून नशेत गळफास घेतल्याचे त्यांचे बंधू श्याम वाघमारे यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...