आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात पाच खून;पत्नीसह दोन मुलींची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि दोन मुलींच्या निर्घृण हत्याकांडासह जिल्हय़ात मंगळवारी पाच खून झाले. बजाजनगरात जितेंद्र कौतिक धांडे (30, रावेर, जि. जळगाव) याने पत्नी अश्विनी (28), मुलगी छाया ऊर्फ छकुली (3) व हर्षदा (9 महिने) यांची गळा आवळून हत्या केली. त्याला पोलिसांनी अटक केली. दुसर्‍या घटनेत भीमशक्ती संघटनेचे जिल्हा सचिव राजू यादवराव जाधव (44) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून सोमवारी रात्री 10.40 वाजेच्या सुमारास चाणक्यपुरीजवळील रेमंड शोरूमजवळ तिघांनी चाकूने हल्ला केला.

उपचार सुरू असताना घाटी रुग्णालयात मध्यरात्री राजू यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे. घरगुती वादातून डोक्यात सिमेंटचा गट्ट घालून पत्नीचा खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यात मनूर येथे घडली. आरोपी पतीला शिऊर पोलिसांनी अटक केली. सविता हिरे असे मृत महिलेचे नाव आहे.