आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रांच्या समयसूचकतेमुळे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून विद्यार्थ्याची सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - श्रेयस पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणार्‍या सागर महादेव कदम याचे शुक्रवारी दुपारी निरालाबाजारातून सहा जणांनी अपहरण केले. मात्र, मित्रांच्या समयसूचकतेमुळे पोलिसांनी नाकेबंदी करून चार अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळत सागरची मुक्तता केली.
शुक्रवारी दुपारी सागर कारमध्ये बसलेला असताना चौघांनी त्याचे अपहरण केले. सूर्या लॉन्सकडे नेऊन दारू पाजली व मारहाण केली. सागरच्या मित्रांनी त्याच्या आईला माहिती दिली. आईने तत्काळ क्रांती चौक पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणकर्ते अशोक रामचंद्र परदेशी, अमित मिसाळ, नयुम पटेल, अय्युब पटेल व विशाल गायकेला जेरबंद केले. रामचंद्र परदेशी यांच्या घरातून सोने चोरीस गेले आहे. याच कारणावरून सागरचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे.