आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: ट्रॅव्हल्सच्या धडकेत बाइकचे दोन तुकडे, उडालेल्या एकाला बॅटरीच्या प्रकाशात शोधले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालनारोडवर सुंदरवाडी पेट्रोल पंपाजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या भरधाव बसने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशांत चंद्रकांत गाढेकर (30), सागर रमेश रोठे (40) अशी त्यांची नावे आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने (एमपी 13 पी 2799) स्प्लेंडरला (एमएच 26 झेड 3090) इतक्या जाेरात धडक दिली की त्यावरील दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. पैकी एकाचा शोध लागल्यामुळे पोलिसांनी अंधारात बॅटरीच्या प्रकाशात शोधमोहीम राबवत त्याला शोधून घाटीत दाखल केले. दुचाकीचे अक्षरश: दोन तुकडे झाले. ठोकर मारणारी बस डिव्हायडरच्या मधोमध जाऊन थांबली. तिचे चालक वाहक दोन्ही घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...