आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध ठिकाणांहून दोन हद्दपार आरोपींना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात गस्त घालत असताना पोलिसांनी सिद्दिकी ऊर्फ सिद्धू खालेद (२४, बायजीपुरा इंदिरानगर, गल्ली क्र.२६) तसेच शेख कैसर या दोन हद्दपार आरोपींना अटक केली.
हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब लक्ष्मण शिरसाट (४७) यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर सिद्दिकीला जवाहर कॉलनीतील त्रिमूर्ती चौकातून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, शेख कैसर हा शहागंज बसस्थानक येथे उभा आहे. त्याप्रमाणे त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असता त्याने शेख कैसर उर्फ शेख अन्वर (२२, कैसर कॉलनी) असे नाव सांगितले. कैसरबाबत अधिक माहिती पोलिसांनी मिळवली असता त्याला औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो मुदत संपण्याआधीच शहरात दिसल्याने त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...