आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - गणेशोत्सवानिमित्त कोकणातील नागरिकांसाठी औरंगाबाद परिमंडळातून 70 नव्या कोर्या बसेस पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांविना या बसेस पाठवण्यात येणार असल्यामुळे महामंडळाला 14 लाख 65 हजार 200 रुपयांचा फटका बसणार आहे. याव्यतिरिक्त इंधनावर सव्वातीन लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. 4 स्पटेंबरपर्यंत या बस मुंबईतील कुर्ला येथे पोहोचणार आहेत.
कोकणात नादुरुस्त बसेसची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे नवीन बसची मागणी करण्यात आली होती. महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकानी औरंगाबाद विभागातून 70 गाड्या पाठवण्याची सोय केली आहे. यामुळे कोकणातील नागरिकांची गणेशोत्सवात होणारी गैरसोय टळणार आहे. एका बसमध्ये 44 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असणार आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर पाठवलेल्या बस परत येण्यास विलंब झाल्यास त्या कोकणविभागाला देण्यात येतील. 175 बसेस 4 ऑगस्टपूर्वीच कुर्ला, नेहरूनगर येथे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्यातून कोकणासाठी 345 बसेस पाठवण्यात येणार असून, चालकांसोबत वाहक, अधिकारी आणि सुरक्षा रक्षक पाठवले जाणार आहेत.
मागणीपेक्षा जास्त बस दिल्या
चिकलठाणा विभागीय कार्यशाळेतून 50 नवीन 2 बाय 2 परिवर्तन बसेस तयार करून देण्याची मागणी होती. मात्र आम्ही 70 बसेस दिल्या आहेत. आता केवळ 10 बसेस पाठवण्याचे काम शिल्लक आहे. त्या दोन दिवसांत पाठवण्यात येतील. जे. पी. चव्हाण, व्यवस्थापक, विभागीय कार्यशाळा
70 बसेस औरंगाबाद विभागातून जात आहेत. त्यांचे नियोजन आणि नियंत्रण आमच्याकडे आहे. सोबत 40 चालक पाठवण्यात येत आहेत. गणेश उत्सवानंतर या गाड्या परत येतील. एस. डी. हजारे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन मंडळ.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.