आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाळीस कोटींच्या कामांना 'ब्रेक', जिल्हाभरात साखळी पूल आणि रस्त्यांची कामे अर्धवट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सुरू असलेली ४० कोटी रुपयांची साखळी पूल आणि रस्त्यांची कामे कासवगतीने सुर आहेत. या कामांमुळे तयार करण्यात आलेले पर्यायी कच्चे रस्ते पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांची डोकेदुखी ठरणार आहेत. डीबी स्टार चमूने जिल्हाभरात सुरू असलेले पूल आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली असता ती संथगतीने सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे केंद्र शासनाने जिल्ह्याला २८ कोटी रुपये दिले आहेत, पण आम्हाला पैसेच मिळाले नसल्याचे कंत्राटदार सांगतात. शासन आणि कंत्राटदारांच्या वादात ही कामे थंड बस्त्यात गेली आहेत.

केंद्र शासनाने मंजूर ४० कोटींच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी जिल्ह्याला आतापर्यंत टप्प्याटप्प्यांमध्ये २८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये २०१२ पासून ४४ पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, सुस्तावलेली यंत्रणा आणि कंत्राटदारांच्या अडेल धोरणामुळे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. वास्तविक कंत्राटदारांसोबत करार करताना ही कामे १२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ही अट पूर्ण केल्याने केंद्र शासनाने उर्वरित निधी रोखून ठेवला आहे. परिणामी कामे अर्धवट राहिली असून ग्रामस्थांची अडचण आणखीनच वाढली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना भेटणार
मी ग्रामविकास समितीमधील सात खासदारांची मुंबईत बैठक बोलावली.या बैठकीत राज्यातील ग्राम सडक योजनेशी संंबंधित बंद कामाचा आढावा घेतला. या वेळी संपूर्ण राज्यातच अडचणीत आलेल्या या सडक योजनेला जीवदान देण्यासाठी पुढील आठवज्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटून हा प्रश्न निकाली काढणार.
पंकजामुंडे, ग्रामविकासमंत्री
सद्य:स्थिती : काम अर्धवट
पर्यायी रस्तेदेखील गैरसोयीचे :
साखळीपुलांची निर्मिती करताना ग्रामस्थांसाठी पर्याय म्हणून वळण रस्ते तयार करण्यात आले. मात्र, पुलाचे काम करण्यासाठी याच रस्त्यांच्या आसपास खोदकाम करण्यात आल्याने ठिकठिकाणी खड्डे, माती, मुरूम आणि दगडांचा ढीग साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्तेसुद्धा बंद होतील आणि ग्रामस्थांना गैरसोयीचे ठरतील. पावसाळ्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण झाल्यास लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो. या पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण केल्यास ग्रामस्थांची ही गैरसोय दूर होऊ शकेल.

पुलाचे काँक्रीट उखडले :
सिल्लोडतालुक्यातील आमठाणा-लोणवाडीजवळील कोटनांद्रा आणि खुलताबाद तालुक्यातील पाडळी-दरेगाव रस्त्यावरील नदीवर मोठ्या पुलाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूला खडीचे ढीग साठले आहेत. शिवाय सहा महिन्यांतच पुलावरचे काँक्रीट उखडल्याचे डीबी स्टार चमूला दिसून आले. त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही संशय घेण्यास वाव आहे.

यागावांमध्ये सुरू आहेत कामे :
पहिल्याटप्प्यात पैठण तालुक्यातील इमामपूरवाडी, पारुंडी तांडा, दादेगाव. कन्नड तालुक्यातील सीतानाईक तांडा, माटेगाव. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, लोणवाडी. गंगापूर तालुक्यातील फुलशेवरा, प्रतापपूर ते गवळी धानोरा, वैजापूर तालुक्यातील सिरसगाव. दुसऱ्या टप्प्यात फुलंब्री तालुक्यातील निधाेना. औरंगाबाद तालुक्यातील जयपूर. पैठण तालुक्यातील पारुंंडी तांडा, दादेगाव, इमामपूरवाडी, निलजगाव तांडा, अाखतवाडा, नारायणगाव. कन्नड तालुक्यातील हतनूर, घुसूर, कोळमबी मांजरा, मालेगाव ठोकळ, पिशाेर भिलदरी. खुलताबाद तालुक्यातील देवनाळा, पाडळी दरेगाव. सिल्लोड तालुक्यातील दिडगाव भराडी, आमठाणा लोणवाडी. सोयगाव तालुक्यातील निंबायती, किन्ही, शिनदोळ, उपलखेडा धाप. गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद, राजुरा येसगाव, फुलशेवरा प्रतापपूर. वैजापूर तालुक्यातील भिवगाव, एकोडी सागज, डागपिंपळगाव, जिरी, बाभूळतेल. पैठण तालुक्यातील राजापूर घारेगाव, लासूरगाव ते अमानतपूरवाडी शिऊर बल्हेगाव ते जिरी बोलठाण या रस्त्यांचा समावेश आहे.

कामाला मुदतवाढ मिळाली असली तरी आजूबाजूचे शेतकरी कामात अडथळा आणतात. अॅप्रोच रस्त्यासाठी जागा मिळत नाही. मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांनी गौण खनिज उत्खननावर बांधकाम साहित्य मिळवण्यास अडचणी येत होत्या. शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचाही सामना करावा लागला.
- सर्व कंत्राटदार

आमची गैरसोय होत आहे
मुळातया योजनेमध्ये भूसंपादनाची अट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतून पुलासाठी अॅप्राेच रस्ते काढणे अयोग्य आहे. तरीही त्यांनी अॅप्रोच रस्ते तयार केले. मात्र, खोदकामादरम्यान रस्ता अरुंंद झाल्याने खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे आमची गैरसोय होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नदीला पूर येतो. गावाचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळयापूर्वी पुलांची कामे करणे गरजेचे आहे.
- ग्रामस्थ

एनडीएचे सरकार असूनही राज्याला विकासकामांसाठी निधी मिळत नाही हे दुर्दैव. याबाबत मी केंद्रीय मंत्र्यांनाही भेटलो, पण पैसाच नसल्याचे त्यांनी सांगितले. निधी नसल्यानेच जिल्ह्यातील ही सगळी कामे रखडली आहेत. औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे.
चंद्रकांतखैरे, खासदार
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करू
नियोजित वेळेत काम पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ४४.१ नुसार दिवसाला दीड हजार रुपये दंडाची शिक्षा केली आहे. पुलांची कामे जलदगतीने सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पावसाळ्यापूर्वी सर्वच पुलांची कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
एस.पी. किवळेकर,
कार्यकारीअभियंता, पीएमजीएसवायई