आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगनगरीचा विकास तीन ते पाच वर्षांत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रशासनाच्या डीएमआयसी ट्रस्टने हजार ४१४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी आयबीआय ही कॅनेडियन कंपनी सल्लागार म्हणून नियुक्त केली असून त्याशिवाय राज्य शासनाने मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी ६०० कोटी रुपये तरतूद करत तीन ते पाच वर्षांत उद्योग क्षेत्रात अामूलाग्र बदल करणारा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्य शासनाचे विविध प्रकारचे क्लस्टर औरंगाबादसह मराठवाड्यातील काही शहरांत होतील. येत्या तीन ते पाच वर्षांत हा कालबद्ध विकास झालेला दिसेल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

पाच वर्षांत डीएमआयसीत ६०० कोटींची गुंतवणूक
येत्या तीन ते पाच वर्षांत या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन सुुरू होईल. याशिवाय इंग्लंड येथील डिलारू करन्सी सिक्युरिटी करन्सी या चलनी नोटा छापणाऱ्या दोन कंपन्या डीएमआयसीत येत आहेत. पाच एकर जागा, ३०० कोटी गुंतवणूक आणि किमान पाचशे रोजगार या कंपन्या देतील.
येत्या पाच वर्षांत डीएमआयसीत एकूण सहाशे कोटींची गुंतवणूक करण्यास चार कंपन्यांनी मंजुरी दिली आहे.
इटलीच्या कोव्हम ऑटो फिल्मला पाच एकर जागा हवी आहे. १५० कोटी गुंतवणूक, दोनशे रोजगार ही कंपनी देईल.
यासाठी ५० कोटी गुंतवणूक, १५० रोजगार मिळणे अपेक्षित आहे. या दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांसोबत सामंजस्य करार केले.
जगप्रसिद्ध हयात हॉटेलला पाच एकर २८ गुंठे जमीन दिली जाणार आहे. ६५ कोटी गुंतवणूक, २०० रोजगार अपेक्षित आहेत, तर जर्मनीची प्रीमियम ट्रान्समिशन कंपनी गिअर बॉक्सचे उत्पादन करणार आहे.
डीएमआयसीच्या जागेचे दर निश्चित झाले असून ३२०० रुपये चौ.मी. असा दर निश्चित केला आहे. तो सरसकट सर्व उद्योगांना लागू आहे.
औरंगाबादला तीन क्लस्टर..
औरंगाबादला प्रिंटिंग क्लस्टरसाठी १६.३२ कोटींची मान्यता मिळाली आहे. तसेच औरंगाबाद शहरातच प्लास्टिक ऑटो क्लस्टर आणि पैठणी क्लस्टरला मान्यता मिळाली आहे.
हेसर्व क्लस्टर येत्या तीन ते पाच वर्षांत पूर्ण होणार आहेत, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुढील स्लाईडवर वाचा, उर्वरीत बातमी...
बातम्या आणखी आहेत...