आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या कामासाठी गडकरींना साकडे, खासदार खैरे यांनी घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत होत असलेल्या 163 किमींच्या औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी प्रलंबित प्रश्नासंबंधी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व संबंधित अधिकार्‍यांसमवेत समन्वय बैठक घेण्यात यावी व तिला खासदार खैरे यांना आमंत्रित करावे व समस्यांचे निराकरण तत्काळ करावे, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या.

औरंगाबाद ते येडशी हे काम ९0 टक्के पूर्ण होत आले आहे, तर सोलापूर - येडशी हे शंभर किमीचे काम सुरू आहे. परंतु औरंगाबादलगतचा बायपास व औरंगाबाद-धुळे रस्त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील भूसंपादन रखडल्याने काम रेंगाळले असल्याचे खैरे यांनी गडकरींच्या निदर्शनास आणले. चौपदरीकरणास उशीर होत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अत्यंत गरजेची झाली आहे. पर्यावरण परवानगीसह भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असूनही हायवे प्राधिकरणाकडून कामाचे वाटप न झाल्याने विलंब होत आहे, असे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

गडकरीही अडकले होते...
औट्रम घाटातील वाहतूक कोंडीचा फटका धुळे व औरंगाबादच्या नागरिकांना बसत असतो. गडकरींनाही तो अनुभव आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना धुळ्याहून औरंगाबादला येत असताना गडकरींचे वाहन या घाटात अडीच तास कोंडीमध्ये अडकले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे सध्याचे प्रदेश संघटन मंत्री डॉ. राजेंद्र फडके होते. त्यावेळीच गडकरींनी घाटाच्या गंभीर प्रश्नावर उपाय शोधण्याची गरज असल्याचे म्हटले होते, असे डॉ. फडके यांनी सांगितले.