आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दगडफेकीच्या घटनेनंतर चिश्तिया चौकात तणाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परमीट रूमच्या सुरक्षा रक्षकाने एका युवतीचा विनयभंग केल्याच्या कारणावरून सिडकोतील चिश्तिया चौकात मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास (5 फेब्रुवारी) दगडफेकीची घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

एका टोळक्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करत हॉटेलमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केली. या प्रकरामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत मोठा जमाव सिडको पोलिस ठाण्यासमोर जमला होता. हॉटेलच्या व्यवस्थापकाने जमावाविरुद्ध तोडफोड व मारहाण केल्याची तक्रार दिली. सुरक्षा रक्षक ज्ञानेश्वर चिटुजी पजई याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलिस उपायुक्त विजय पवार, पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जमाव पांगला. या भागात वाद झाला तेव्हा दोन पोलिस कर्मचारी चौकीवर होते. त्यांना न जुमानता टोळक्याने दगडफेक केली. त्यामुळे परिसरातील व्यापारी भयभीत झाले होते. काही काळ येथील दुकाने बंद होती. काही काळ रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती.