आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू, सोमवारी आकडेवारी स्पष्ट हाेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शुक्रवारची सकाळ ते शनिवारी सकाळपर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला असला तरी वेगवेगळ्या परिसरात त्याची हजेरी वेगळ्या प्रमाणात होती. चिकलठाणा सर्कलमध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. तेथे ११७ मिलिमीटर पाऊस पडला. दुसरीकडे कांचनवाडी येथे चिकलठाण्याच्या निम्मा म्हणजे ६१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जुन्या शहरात म्हणजेच औरंगपुरा परिसरात तो दिवसभरात ८५ मिलिमीटर कोसळला.

गुरुवारी रात्रीपासून पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. रात्रभर तो कोसळत होता. तेव्हाही त्याचे प्रमाण शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगळे असेच होते. त्यानंतर शुक्रवारी दिवसभरातही तसेच प्रमाण राहिले. शनिवारी अनपेक्षितपणे सूर्यदर्शन झाले. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल, असे वाटत होते; परंतु सायंकाळपर्यंत तो कोसळला नाही.

औरंगाबाद तालुक्याचा विचार करता लाडसावंगी येथे शुक्रवारी १६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद चितेपिंपळगाव (५६) इतकी झाली. चौका (७५), करमाड (८५) येथे तालुक्याच्या सरासरीइतका पाऊस झाला.
औरंगाबाद | गुरुवारीरात्री दाखल झालेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्कलमध्ये दिवसभरात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात एका दिवसात सरासरी ६०.९७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात पाऊस बरला नाही. शुक्रवारी औरंगाबाद, फुलंब्री सिल्लोड तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. जिल्ह्यात ज्या सात मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला ते सर्व मंडळे या तिन्ही तालुक्यांतील आहेत. गुरुवारी रात्री सोयगाव तालुक्याला पावसाने झोडपले होते. परंतु शुक्रवारी या तालुक्यात अवघा ३५.३३ मिलिमीटर पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. तालुक्याची सरासरी १०१.२५ इतकी होती. नद्यांना पूर, नालेही तुडुंब असे चित्र जिल्ह्याच्या काही तालुक्यांत असले तरी पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील २४ तासांत मोठा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री तालुक्यातील पावसाप्रमाणे येथेही पाऊस व्हावा, अशी येथील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
औरंगाबाद
गुरुवारी रात्री अन् शुक्रवारी दिवसभर धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात नेमके किती नुकसान झाले, याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारी त्यासाठी वेळ मिळाल्याने पंचनामे सुरू झाले असून रविवारीही ते सुरू राहतील. त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला जाणार आहे. त्यात जिल्ह्यात पावसाने किती नुकसान झाले, हे समोर येऊ शकेल.

औरंगाबाद सिल्लोड या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाल्याचा नजर अंदाज आहे. औरंगाबाद तालुक्यातील अंजनडोह, सेलूद, चारठा, नायगव्हाण, लाडसावंगी, औरंगपूर, सुलतानपूर या गावांतील नुकसानीचा आकडा मोठा असण्याची शक्यता असून तेथे पंचनामे सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले. शनिवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. पाऊस थांबल्यामुळे पंचनामे करणे शक्य झाले. रविवारी सुटी असली तरी पंचनामे केले जाणार आहेत. त्यानंतर सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. तेव्हा पावसाच्या हाहाकारातील नुकसानीचा नेमका आकडा समोर येऊ शकेल. नेमकी किती जनावरे वाहून गेली, किती ठिकाणी घरे पडली, कोठे भिंती पडल्या याचा शोध या पंचनाम्यांत घेतला जात आहे.

अतिक्रमणधारकांनामदत नाहीच
दरम्यान,नदी तसेच नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण करणाऱ्यांना कोणतीही मदत केली जाणार नाही. मालमत्तांचे जे काही नुकसान झाले, त्यात नदी तसेच नाल्यांच्या काठावर केलेल्या अतिक्रमणांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्या नुकसानीचे पंचनामे होणार असले तरी या मालमत्ता अतिक्रमण असल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

कडकउन्हामुळे दिलासा
गुरुवारीरात्री सुरू झालेल्या दमदार पावसाने बघत बघता सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव तालुक्यात जोरदार तडाखा दिला. अनेकांची पिके वाहून गेली, काही ठिकाणी जनावरेही वाहिली. शेतात पाणी साचून होते. शनिवारी सुदैवाने सकाळपासून स्वच्छ ऊन पडल्याने शेतातील पाणी काढणे, शक्य तेवढ्या पिकांना उभे करण्याचे काम शेतकऱ्यांना करता आले. नदी, नाल्यांचा पूरही शनिवारी ओसरला होता. त्यामुळे पिकांचे नेमके किती नुकसान झाले, याचा पक्का अंदाज शेतकऱ्यांना घेता आला. लगेच पाऊस सुरू झाला तर शेतात पाणी साचू नये, याची खबरदारी घेण्यात शेतकरी व्यग्र होते.
सुखना नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.
निल्लोड १२२
लाडसावंगी १६५
चिकलठाणा ११७
फुलंब्री १०५
आळंद ११०
वडोद बाजार १०५
अंभई १४०

अतिवृष्टीची नोंद झालेली मंडळे
सर्व अाकडेवारी मिमीमध्ये
औरंगपुरा ८५
उस्मानपुरा ७७
भावसिंगपुरा ७०
कांचनवाडी ६१
हर्सूल ८८
चिकलठाणा ११७

तलाव फुटल्याची अफवा
दरम्यान,लाडसावंगीतील शंभरावर घरांचे नुकसान झाले. तेथे शहरातील काही संस्था मदतीसाठी गेल्या होत्या. मात्र, खिचडीचे वाटप सुरू असतानाच गावाच्या वरील बाजूस असलेला पाझर तलाव फुटल्याची अफवा कोणीतरी पसरवली. त्यामुळे पळापळ झाली, लोकांनी खिचडीची मदत स्वीकारता पलायन केल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दामले यांनी सांगितले.