आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - जिल्ह्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाने 95 कोटी 12 लाख रुपयांचा आराखडा तयार केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी दिली. प्रजासत्ताकदिनी पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यकमानंतर पालकमंत्री बोलत होते.
प्रशासनाच्या आराखड्यात टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण, विहिरीची खोली वाढवणे, जलस्रोताच्या 500 मीटर परिसरात पाण्याच्या उपशावर निर्बंध घालणे अशा महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीज बिलात सूट, परीक्षा शुल्कात माफी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस या वर्षी स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहितीही थोरात यांनी या वेळी दिली.
कॉरिडॉरमुळे 23 लाख रोजगार
दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमुळे 23 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून, राजमाता जिजाऊ कुपोषण अभियान, महसूल विभागाच्या योजना, पैठण-आपेगाव तीर्थक्षेत्र विकास पर्यटन प्राधिकरण, रस्ता रुंदीकरण आदी योजनांमध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असल्याचे ते म्हणाले. या वेळी राष्ट्रपती पदक विजेते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय बाविस्कर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.