आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad District Planning Comity Election Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीपीसी: 100 टक्के मतदान; शुक्रवारी मतमोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा नियोजन मंडळाच्या 15 जागांसाठी आज 100 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी अडीच वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व 60 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. 7 उमेदवार बिनविरोध ठरले. शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मतमोजणी होणार आहे.

कोटा निश्चित असल्यामुळे ही निवडणूक साधारणपणे बिनविरोध होते. मात्र या वेळी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे तसे झाले नाही. शेवटच्या दिवशी सातच मतदारसंघांत अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ते बिनविरोध ठरले. अन्य जागांसाठीही प्रयत्न झाले होते. मात्र त्याला उशीर झाला. या 15 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदेचे सदस्य यासाठी मतदार होते. सर्वच्या सर्व सदस्य मतदानाला हजर होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी अडीच वाजताच 100 टक्के मतदान झाले. बारा वाजेनंतर एकेक सदस्य मतदानासाठी दाखल झाले होते.