औरंगाबाद - निवडणूक घोषित होताच उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून, भगवान घडामोडे व एकनाथ जाधव हे दोन्ही जिल्हाध्यक्ष मुंबईत तळ ठोकून आहेत. औरंगाबाद पूर्व आणि फुलंब्री हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत.
सर्व्हेत सावे, बागडे,बनकर यांची नावे आघाडीवर
पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत पूर्वमधून अतुल सावे, संजय केणेकर तर फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे, एकनाथ जाधव आणि सिल्लोडमधून सुरेश बनकर, श्रीरंग साळवे यांची नावे आघाडीवर आहेत. फुलंब्री आणि सिल्लोडमधून इच्छुकांची संख्या अधिक आहे.
भाजप लढवत असलेल्या तीन जागांपैकी फुलंब्री आणि सिल्लोडमध्ये इच्छुकांची संख्या जात आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरून ही नावे संसदीय बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहेत. दोन दिवसांत पहिली यादी घोषित होणार असली तरी यामध्ये औरंगाबादमधील उमेदवारांच्या नावाची शक्यता धूसर आहे.
चौघांनी गाठली मुंबई
पूर्व मतदारसंघातून अतुल सावे, संजय जोशी, विजया रहाटकर, संजय केणेकर आणि बसवराज मंगरुळे इच्छुक आहेत. त्यापैकी केणेकर आणि बसवराज मंगरुळे पूर्वमधून तिकीट मिळावे म्हणून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. तर फुलंब्रीतून माजी मंत्री हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, सुरेंद्र साळुंखे आणि बापू घडामोडे दावा करत आहेत. यामध्ये घडामोडे आणि जाधव तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. तर इतर इच्छुकांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईवारी केली.