आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावाची जगावेगळी गोष्ट, शेतकऱ्यांपेक्षा जास्त पशुपालक; दररोज 10 हजार लिटर दुध उत्पादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रसुलपूरा हे डोंगरावर वसलेले टुमदार गाव आहे. - Divya Marathi
रसुलपूरा हे डोंगरावर वसलेले टुमदार गाव आहे.
मराठवाड्याला दुष्काळाचा शाप आहे असेच म्हटले जात होते, मात्र यंदा बरसलेल्या वरणराजाने मराठवाड्याच्या भाळावरील हे विशेषण धुवून टाकले आहे. मराठवाड्याची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात एक गाव असे आहे की याची गोष्टच जगावेगळी आहे. बहुतेक ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन, कुकुटपालन केले जाते. मात्र येथे पशुपालनाला जोड म्हणून शेती केली जात आहे.
दररोज 10 हजार लिटर दुध उत्पादन
> औरंगाबादपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरील खुलताबाद तालुक्यातील रसुलपूरा येथे शेतकऱ्यांपेक्षा पशुपालकांची संख्या जास्त आहे.
> येथे दररोज 10 हजार लिटरच्यावर दूध उत्पादन होते.
> पशुपालन व कोंबड्यापालन येथील प्रमुख व्यवसाय आहे. जवळपास सर्वच गावकरी वर्षानुवर्ष पशुपालनाचा व्यवसाय करतात.
> शेती होते ती फक्त गुरांच्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी.
> येथे गोठेच गोठे (जणावरांसाठी) व खुराडेच खुराडे (कोंबड्यांसाठी) पहायला मिळतात.
गावात येताना वाटते भीती
> या गावाचे भौगोलिक क्षेत्र फार गमतीदार आहे.
> औरंगाबादकडून येतांना डोंगर कपारीतून रस्ता या गावाकडे येतो.
> डोंगर पाहून असे वाटते की वर वसलेल्या या गावात जाता येते की नाही, पण शासनाचे रस्ते या गावापर्यंत पोहोचले आहेत.
> रस्त्यांच्या मार्गाने शासनाच्या विविध योजना आणि विकासही येथे पोहोचला आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा.
> आमचे जितराब (जणावरे) हीच आमची शेती आहे.
> हसन पठाण यांच्याकडे 40 म्हशी व 5 गायी
> रसुलपुरा गावाची हुिरवाई...
> कसे जाता येईल रसुलपूरा येथे
बातम्या आणखी आहेत...