आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्ध संस्कृती इथे जन्मली, इथेच रुजली इथेच वाढली, कुलगुरूंनी 15 मिनिटांत रचली कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बुद्ध संस्कृती इथे जन्मली,  
बुद्ध साहित्याचे बीजे रोवली,  
इथेच रुजली इथेच वाढली,   
इथेच रुजली बुद्ध संस्कृती..!”
 
औरंगाबाद  - या काव्यपंक्तींची रचना एखाद्या  सिद्धहस्त कवीने केल्याप्रमाणे आहे. पण सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी ती रचली.  होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अाैरंगाबादचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत ही कविता रचली.
 
 बुधवारी (१० मे) बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकीकडे मुख्य वक्त्यांचे भाषण सुरू होते, तर दुसरीकडे कुलगुरू  कविता रचण्यात व्यग्र होते.  एवढेच नव्हे तर कविता पूर्ण केल्यानंतर काव्य अभिवाचन करून त्यांनी उपस्थितांची मनमुराद दादही मिळवली. पुढे ते म्हणतात,  
 
पावन झाला मराठवाडा,  
संवर्धनाचा ध्यास घेतला,   
सहा शतके काम करुनी,  
इथेच घडले अजिंठा-वेरूळ  
 
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे वास्तव्य असलेल्या मराठवाडा आणि बुद्ध संस्कृतीचे ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न कुलगुरूंनी या  ओळींतून केला. विशेष म्हणजे सतत इंग्रजी बोलणाऱ्या कुलगुरूंची मराठी भाषेवरही पकड असल्याचे या कवितेतून दिसते.  
 
बुद्ध तत्त्वज्ञान, बुद्ध संस्कृती  
इथेच जतन करून ठेवली  
मार्ग दाखवला मानवतेला,   
अजिंठा, एलोरा येथेच घडले  
पावन झाला मराठवाडा   
 
बुद्धांचे तत्त्वज्ञान जगभर पसरले, मात्र अजिंठा आणि वेरूळ लेणींमध्ये संस्कृती जतन केल्यामुळे मराठवाड्याने विश्वाला मानवतेचा मार्ग दाखवल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी मराठवाड्याचाही गौरव केला.   
 
झाली भूमी मानवतेची,  
अजिंठा विद्यापीठ इथेच स्थापिले,   
काहीच नव्हते इतरत्र तरी,   
तेव्हाच मराठवाडा समृद्ध होता,  
ज्ञानभूमी ही मानवतेची,  
पावन झाला मराठवाडा   
 
नालंदा, तक्षशिला ही बौद्ध विद्यापीठे जेव्हा अस्तित्वात होती त्याच दरम्यान अजिंठा लेणीच्या पायथ्याशी अजिंठा विद्यापीठ अस्तित्वात होते, असा विचार कुलगुरू सतत मांडत असतात. उपरोक्त पंक्तीतून त्यांनी या ‘हायपोथिसिस’चा पुनरुच्चार करत मराठवाडा ही मानवतेची ज्ञानभूमी असल्याचे म्हटले. 
चला उठूया संघटित होऊ, 
ज्ञानाचा मार्ग पत्करू, 
पंचशीलाचा मार्ग आपला, 
चला घेऊ सर्वांना बरोबर, 
नवसमाज आपण घडवू 
अजिंठा-वेरूळ इथेच घडले 
बुद्ध संस्कृती इथेच जन्मली 
इथेच रुजली इथेच वाढली” 

संघटित होण्याचा मार्ग जो बाबासाहेबांनी सांगितला, तथागतांनी दिलेला ज्ञानमार्ग अन् पंचशीलाचे पालन करून नवसमाज निर्मितीचा क्रांतिकारी विचार डॉ. चोपडे यांनी या पंक्तीतून मांडला आहे. वक्त्यांच्या आधीच अध्यक्षीय भाषण केल्यानंतर पुन्हा माइकचा ताबा ते कशासाठी घेत आहेत, याचे सर्वांना कुतूहल वाटत होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...