आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रक्रिया न करताच सोडले जाते ड्रेनेजचे पाणी, प्लास्टिक कचरा आणि घाणीचे ढिगारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अख्ख्या शहरातील ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जात आहे. त्यामुळे शहरातील भूजल दूषित होत आहे. डीबी स्टारने शहरातील 72 नाल्यांची पाहणी केली. त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या. पावसाळा वगळता वर्षभर या नाल्यांची सफाईच होत नाही. त्यातच रोज टाकला जाणारा कचरा, प्रवाहामध्ये येणारा अडथळा यामुळे सर्वत्र विषारी वायू उत्सजिर्त होतात. परिणामी अनेक घातक आजार होतात. या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारा एकच एसटीपी प्लांट आहे. तोही खूप छोटा असल्याने ड्रेनेजचे पाणी जमिनीत खोलवर मुरत असून संपूर्ण शहरातील भूजल दूषित करत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरभर एसटीपी प्लांट उभारण्यासंदर्भात वारंवार पालिकेला नोटिसा बजावल्या. त्यावर सुनावणीही झाली, पण तरीही कार्यवाही मात्र झाली नाही. त्यामुळे शहरातील ‘जीवनच’ धोक्यात आले आहे.

नाल्यांमुळे भूजल दूषित

नाल्यांची पावसाळ्यापूर्वी थातूरमातूर तोंडदेखली सफाई होते. त्यानंतर वर्षभर या नाल्यांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया न करताच नाल्यांमध्ये सोडले जाते. त्यात नाल्यांमध्ये कचरा, प्लास्टिक, हॉटेलातले खराब अन्न आणि जे जे टाकता येईल ते ते टाकले जाते. सफाई होत नसल्यामुळे कचर्‍यांचे ढीग वाढतच जातात. त्यामुळे दुर्गंधी, डास आणि रोगराईचा प्रादुर्भाव कायम असतो. जोडीलाच ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जाते.

एसटीपी यंत्रणाच नाही

दररोज 107 एमएलडी एवढे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच नदी नाल्यात सोडले जाते. मनपाकडे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे एसटीपी प्लांट नाहीत. सध्या मनपाचा एकच एसपीटी प्लांट आहे. मात्र, त्यात 5 एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याआधी वारंवार पालिकेला नोटिसा बजावून पुरेसे एसटीपी प्लांट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु पालिकेने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याची प्रदूषण मंडळाने गंभीर दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजावली. मुंबईच्या प्रदूषण नियंत्रण कार्यालयात आयुक्तांची सुनावणी झाली. मुख्यमंत्र्यांनी सरकार दरबारात तत्कालीन आयुक्त व सहायक नगररचना संचालकांना धारेवर धरले. आता मात्र औरंगाबाद मनपा राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाचे गाजर दाखवत आहे. हे काम लवकर झाले नाही तर भूजल धोक्यात येईल.

डीबी स्टारने केली 72 नाल्यांची पाहणी

चमूने संपूर्ण शहरातील 72 नाल्यांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कचरा, प्लास्टिक बॅग, सडका भाजीपाला, हॉटेलमधील खराब अन्न आणि मांसाचे तुकडे या नाल्यांमध्ये टाकलेले आढळले. त्यामुळे त्या त्या परिसरात भयंकर दुर्गंधी पसरते. पावसाळा संपल्यानंतर सर्वच नाल्यांना कचराकुंडीचे स्वरूप येते. डुकरेही नाल्यात ठाण मांडून असतात. त्यामुळे तर साथीचे आजार पसरतात.

कायद्याने गुन्हा

महाराष्ट्र जल प्रदूषण कायदा 1974 अन्वये कलम 33 ए अंतर्गत ड्रेनेजचे पाणी थेट नाल्यात सोडणे गुन्हा आहे. त्यामुळे प्रदूषण व दुर्गंधी वाढते. पालिकेला याबाबत वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. शहरात 107 एमएलडी ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते.

क्षारांचे प्रमाण वाढले

नाल्यांतील दूषित पाणी तुंबल्यास ते जमिनीत मुरते व आसपासच्या स्रोतांमधील पाण्याचा हार्डनेस वाढतो. क्लोराइड, काबरेनेट, बायकाबरेनेट, तसेच फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. नाल्यांलगत आणि शहर परिसरात बोअरवेलच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडीयम आदी विषारी घटक वाढत असल्याने या पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढत आहे.

डॉ. सतीश देशपांडे, भूगर्भतज्ज्ञ

स्वच्छता वारंवार व्हावी

तुंबलेल्या नाल्यांमुळे मिथेन, इथेन आदी विषारी गॅसेस तयार होतात. शहरातील जलवाहिन्या व मलवाहिन्या यांचे अंतर जवळ असल्याने ड्रेनेजमिर्शित पाण्याचा त्रास होतो. नाल्याचे अंतर हातपंपापासून जवळ असल्यास झिरपणारे पाणी त्यात मिसळण्याची भीती असते. परिणामी अनेक आजार होतात. नाल्यांची सफाई वारंवार केली पाहिजे.

डॉ. जयर्शी कु लकर्णी,आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

घातक आजार होतात

इकोला हा जीवाणू नाल्यात वाढ होणार्‍या अनेक जीवाणूंचा पोशिंदा असतो. तो भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांमध्ये जातो आणि पुन्हा मानवी शरीरात मिसळतो. हॉटेल, वसाहती यांचे सांडपाणी नाल्यात येते. त्यामुळे दमा, थंडीताप, गॅस्ट्रो, पचनक्रिया बिघडणे तसेच यकृताचे घातक आजार होण्याची शक्यता असते.

डॉ. एन. एन. बंदेला, पर्यावरणतज्ज्ञ

डिटर्जंटचे प्रमाण अधिक

नाल्यातील पाण्यात डिटर्जंटचे प्रमाण अधिक असल्याने हेवी मेटल्स, लेड, कॉपर, मक्र्युरी, सल्फर, हायड्रोजन सल्फाइड हे अतिशय विषारी वायू तयार होतात. नाल्याच्या पाण्यामुळे होणारे आजार हे स्लो पॉयझन असतात. लवकर लक्षात येत नाहीत.
डॉ. टी. के. चौढेकर, केमिस्ट

शेवाळ साचताच सफाई व्हावी

मानवी विष्ठातील जीवजंतू घातक असतात. ते नाल्यात जातात. वेळोवेळी सफाई झाली नाही तर शेवाळ निर्माण होऊन नैसर्गिक पाण्यातील ऑक्सिजन कमी करतात. त्यामुळे निदान शेवाळ साचले की सफाई व्हावी, ही अपेक्षा.

डॉ. क्षमा खोब्रागडे, पर्यावरणतज्ज्ञ

एसटीपी प्लांटसाठी निधी मिळणार

केंद्र शासनातर्फे 406 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाच्या तांत्रिक मान्यता समितीने 376.16 कोटी रकमेस मान्यता दिली आहे. हुडको या संस्थेला शासनाच्या आदेशाने 50 टक्के कर्जाचा हिस्सा प्राप्त होणार आहे. मिळणार्‍या 183 कोटींतून एसटीपी प्रकल्पाचे काम<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>केले जाणार आहे.
एम. डी. सोनवणे,शहर अभियंता, महानगरपालिका