आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता मोकळा करा; अतिक्रमणधारकांना नोटिसा द्या, प्रशासकीय अधिकार्‍यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उस्मानपुरा परिसरातील एकनाथनगर रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गृहराज सोसायटीमधील रस्त्यावरील अतिक्रमण काढून हा रस्ता मोकळा करण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत. डीबी स्टारने या प्रश्नाला वाचा फोडताच अतिक्रमण हटाव विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी इमारत निरीक्षकांची बैठक घेतली व अतिक्रमणधारकास तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतरही जर त्यांनी अतिक्रमण काढले नाही तर ते लगेच जमीनदोस्त करा, असेही त्यांनी निरीक्षकांना बजावले.

एकनाथनगर रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गृहराज सोसायट्या दोन्ही सोसायटींच्या मधून हा 15 फुटांचा रस्ता होता. 20 वर्षांपासून सोसायटीचे लोक या रस्त्याचा वापर करत होते; पण आता या रस्त्यावर अतिक्रमण करून टपाल खात्यातील रेकॉर्ड अधिकारी पी. डी. भांडेकर यांनी एक पक्की खोली, स्नानगृह आणि स्वच्छतागृह बांधले. दुसर्‍या बाजूने गाळा क्रमांक 411 चे गाळाधारक जी. टी. जाधव यांनी सुरक्षा भिंत बांधून हा रस्ताच गिळंकृत केला. या अतिक्रमणामुळे रस्ता गायब झाला असून परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रकरणी मनपा आणि म्हाडा मात्र एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलत आहेत.