आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष पदाधिकाऱ्यांची दालने चकाचक, महिला सभापतींच्या दालनाला अवकळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेत प्रत्येक कामात विरोधाभास असल्याचे दिसून येते. प्रमुख पुरुष पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये खर्चून आपली दालने चकाचक करून घेतली. दुसरीकडे शहर स्वच्छता समितीच्या महिला सभापती ज्योती जयेश अभंग यांच्या दालनाची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही. यामुळे दालनाला अवकळा आली आहे.

 

गटनेते आणि सभापतींनी आपल्या दालनात रंगरंगोटी करून लाखो रुपये खर्च केले. मात्र गेल्या सात वर्षांपासून शहर स्वच्छता समिती सभापतींच्या दालनाची एकदाही दुरुस्ती झाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार मनपा प्रशासनाला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विद्यमान सभापती अभंग यांनी प्रशासनाला दोन वेळा लेखी पत्र देऊन दालनाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. दोन्ही वेळी अधिकाऱ्यांनी पाहणी करून वेळ मारून नेली. दालनात सभापतींसह इतर महिलांनाही बसणे कठीण झाले आहे.
अँटी चेंबरमध्ये महत्त्वाच्या बैठका आणि इतर निर्णय घेण्यात येतात. मात्र येथील अँटी चेंबरमध्ये नादुरुस्त खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. याचा पीओपी कोसळत आहे.
स्वच्छतागृह‘असून अडचण, नसून खोळंबा’ : मनपातसर्व दालनात स्वतंत्र शौचालय आहे. शहर स्वच्छता समिती सभापतींच्या दालनात शौचालय असूनही त्याचा उपयोग होत नसल्याने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्याचे दिसते. स्वच्छतागृहाचा स्लॅब कोसळला आहे. त्यात प्रचंड घाण असून खिडकीला काच नाही, पाणी नाही, वॉशबेसीनही नाही.

 

माझे दालन स्वच्छ नाही, शहर कसे स्वच्छ राहील
मी शहर स्वच्छता समिती सभापती असूनही माझेच दालन अस्वच्छ आहे. मग शहर कसे स्वच्छ राहणार. एक शिपाई मागितला, तो अद्याप दिला नाही.
- ज्योती अभंग, सभापती

बातम्या आणखी आहेत...