आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या उस्मानपुऱ्यातील शाळेत टोळी युद्धाचा थरार, टवाळखोरांकडून विद्यार्थ्यांना जबर मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उस्मानपुरा येथील गुरुतेगबहादूर शाळेत नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये मारहाणीच्या वादात, बाहेरच्या तरुणांनी हस्तक्षेप केला आणि थेट शाळेत घुसून जबर मारहाण केली. या शाळेतील मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

नववीतल्या दोन मुलांचे वर्गात भांडण झालं. त्यापैकी एका मुलाने ही बाब मोठ्या भावाला सांगितली. मारल्याचा राग मनात धरुन विद्यार्थ्याचा भाऊ आणि सात जण हातात लाठ्या-काढ्या आणि साखळ्या घेऊन फिल्मी स्टाईलने शाळेत घुसले. त्यानंतर ते मुलांना मारहाण करु लागले.

शिक्षकांना हा प्रकार समजताच त्यांनी शाळेचे मुख्य गेट लावून घेतल्याने हे गुंड आतच अडकले. त्यामुळे या मुलांची ओळख पटू शकली. उस्मानपुरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुख्याध्यापकांनी या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा गुडंगिरी करणाऱ्या आठ तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाईडवर व्हिडिओ

 

बातम्या आणखी आहेत...