आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूच्या धाकावर महिलेवर अत्याचार; वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तरुणीने दुसर्‍याबरोबर लग्न केल्यामुळे चिडलेल्या तरुणाने तिचे अपहरण करून तसेच तिला चाकूचा धाक दाखवून अनेक वेळा बलात्कार केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील सिंगवा येथे घडली. वर्षभरापूर्व घडलेल्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने बलात्कार करणार्‍या तरुणासह त्याला मदत करणार्‍या पाच जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फतियाबाद माहेर असलेल्या या विवाहितेचे आई-वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. 26 जुलै 2012 रोजी ती 7 वर्षांच्या मुलासह चिंचखेडा येथे सासरी गेली होती. तिला रामू बुधासिंग सोनवणे याने गाठून ‘मी तुझ्याशी लग्न करणार असताना तू दुसर्‍याशी का लग्न केलेस?’ असे म्हणत तिला चाकूचा धाक दाखवून सिंगवा येथील त्याची बहीण संगीता बुधासिंग सोनवणे हिच्या घरी नेले. तेथे तिला डांबून ठेवून रामूने तिच्यावर सतत बलात्कार केला. या वेळी बुधासिंग सोनवणे, राजूबाई बुधासिंग सोनवणे, संगीता सोनवणे, चरणसिंग ठाकूर आदींनी त्याला मदत केली. यानंतर संगीताने या पीडितेवर दबाव आणून ‘डान्सबारमध्ये काम कर; अन्यथा जिवे मारू’ अशी धमकी दिली. मुंबई, देवळाली कॅम्प नाशिक, शिंगवा आदी ठिकाणी नेऊन रामूने बलात्कार केल्याचे या विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.