आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरला 10, औरंगाबादला फक्त दाेनच पर्यटन योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील विशेष पर्यटन जिल्हा म्हणून नागपूरचा समावेश ही सहजासहजी झालेली बाब नसून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर तयारी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या पर्यटन धोरण २०१६ तील तरतुदी पाहून हे लक्षात येते. आगामी दहा वर्षांच्या या धोरणात नागपूर आणि विदर्भासाठी थोड्याफार नव्हे तर १० दणदणीत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मेडिकल टुरिझम, टायगर टुरिझम, एज्युकेशनल टुरिझम, अॅडव्हेंचर टुरिझम, क्युसिन टुरिझमसारख्या नवीन पर्यटन प्रकारांसाठी विदर्भाला प्राधान्य देण्यात आले आहे.

तर औरंगाबादच्या वाट्याला पुन्हा एकदा वेरूळ-अजिंठ्याचा विकास आणि वेरूळ महोत्सवाचे अायोजन अशा दोनच बाबी आहेत.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या पर्यटन धोरणात तिसरा पर्यटन जिल्हा म्हणून नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. हा दर्जा देताना तो कसा सार्थ ठरेल याची पुरेपूर काळजी घेतल्याचे पर्यटन धोरणाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते. पर्यटन धोरणात नागपूरचा उल्लेख विदर्भ असा आहे, तर औरंगाबादचा उल्लेख करताना मराठवाड्याचे नाव कोठेच आलेले नाही. म्हणजेच नागपूरच्या नावाखाली संपूर्ण विदर्भाचा पर्यटन विकास करण्याची योजना आहे.

अग्रक्रमाने पूर्णत्वास नेल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत औरंगाबादसाठी अजिंठा, वेरूळ संवर्धन प्रकल्प वेरूळ महोत्सवाचे आयोजन अशा दोनच योजना आल्या आहेत. विदर्भासाठी मात्र लोणारचा मेगा टूरिझम डेस्टिनेशन म्हणून विकास, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा हे लेक टूरिझम सर्किट म्हण्ून विकास, ताडोबा परिसरात वन्यजीव टुरिझम इस्टेट म्हण्ून विकास, विदर्भासह मालवण, कोकण, कोल्हापूर, मुंबई स्ट्रीट फूडसाठी खास कलीनरी टुरिझम, मेळघाट ताडोबा, पेंचमध्ये नेचर टूरिझम. यासाठी नेचर पार्कच्या भोवताली १० किलोमीटर परिसराचा स्पेशल टूरिझम इस्टेट म्हणून विकास, टायगर इको टुरिझमअंतर्गत ताडोबा आणि पेंच टायगर रिझर्व्हमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा निर्माण करणे. या सुविधांचे राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय समारोहात प्रमोशन करणे आदी तब्बल दहा महत्त्वाकांक्षी योजना देण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...