आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस; बुधवारपर्यंत खुलासा देण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात नोकरीला असतानाही खासगी प्रॅक्टिस करणार्‍या वरिष्ठ सर्जन आणि रुग्णांची पळवापळवी करणार्‍या ट्रेनी डॉक्टरला दंत महाविद्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीबी स्टारने या प्रकरणी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विभागाने हा निर्णय घेतला.

शासकीय नोकरी करत असताना खासगी रुग्णालय थाटणे, एनपीए घेऊन खासगी प्रॅक्टिस करणे, एवढेच नव्हे, तर ज्या शासकीय रुग्णालयात नोकरी करतो त्याच रुग्णालयातील रुग्णांची पळवापळवी करणे आदी धंदे करणार्‍या डॉक्टरांचा डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला होता. त्यामुळे घाटी वतरुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बारपांडे यांनी डॉक्टर अर्चना वाघमारे व आशिष दिवेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या बुधवारपर्यंत या प्रकरणी खुलासा करावा, असे आदेशही त्यात देण्यात आले आहेत. दुसरीकडे डीबी स्टारने भंडाफोड करताच नोबेल क्लिनिकमधील डॉक्टर मेहनाज यांची हकालपट्टी करून हे क्लिनिकच गुंडाळण्यात आले आहे.

शासकीय दंत महाविद्यालयाचा देशात 14 वा क्रमांक
शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. तत्पर रुग्णसेवा, शैक्षणिक र्शेष्ठत्व, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक यंत्रसामग्री आदी निकषांमध्ये या महाविद्यालयाने आपला दर्जा राखला आहे. आउटलूक हे नामांकित इंग्रजी साप्ताहिक व एमडीआरएच्या वतीने 2013 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात संस्थेने राष्ट्रीय पातळीवर 14 वा क्रमांक मिळवल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सु. रा. बारपांडे यांनी डीबी स्टारशी बोलताना दिली. यापूर्वीही संस्थेने 10 वा आणि 12 वा क्रमांक पटकावला होता. ही कामगिरी व बहुमान मिळवण्यात सर्व कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचे अधिष्ठाता सांगतात.

खुलासा आल्यानंतर कारवाई
>संबंधित डॉक्टरांना याबाबत बुधवारपर्यंत खुलासा मागितला आहे. तो आल्यानंतर तथ्य तपासून कारवाई केली जाईल.
-डॉ. बारपांडे, दंत महाविद्यालय अधिष्ठाता