आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- ‘ओळख असेल तर घाटी, नाही तर माती’ असे विनोदाने म्हटले जात असले तरी वस्तुस्थिती तशीच आहे. ‘अमुक याचा तो’ अशी ‘प्रमाणित’ ओळख नसेल तर गोरगरीब, सामान्यांची अवस्था ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशीच होते. त्यांच्यासाठी ओपीडी ते आयपीडी ही अनंत कटकटी आणि जीवघेणी फरपट ठरते. उपचार, तपासण्या, शस्त्रक्रियांसाठी सामान्यांना महिना-महिना प्रतीक्षा करावी लागते. अनेक विभागांच्या या बेबंदशाहीवर ना प्रशासनाचा अंकुश आहे ना राज्य सरकारचा.
गरीब रुग्णांसाठी घाटी हा शेवटचा आधार. त्यातील काहींकडे केस पेपर काढण्यासाठी दहा रुपयेही नसतात. अनेक नातेवाईक एक वेळचे जेवण करून आपल्या रुग्णाच्या उपचारासाठी ताटकळलेले असतात. खासगीत उपचार करण्याची ऐपत नसते म्हणून हातावर पोट असलेल्या या नातेवाइकांना कामधंदा सोडून रुग्णाजवळ थांबावे लागते. अशांचा घाटीत कुणीच वाली नाही.
चार तासांची ओपीडी अडीच तास !
सकाळी साडेआठ ते साडेबारा अशी चार तासांची ओपीडीही पूर्णवेळ होत नाही. साडेआठला कुठलाही डॉक्टर उपस्थित नसतो, असे प्रत्यक्षदर्शीच सांगतात. केस पेपर काढण्यासाठीचे काउंटरही सुरू होत नाही. प्रयोगशाळा नऊ-साडेनऊला सुरू होते. साडेबारानंतर सॅम्पल देता येत नाही. नऊनंतर निवासी, साडेनऊ-दहानंतर वरिष्ठ डॉक्टर-विभागप्रमुखांचे ‘आगमन’ होते. त्यानंतर ओपीडी बारापर्यंत चालते. मोजके विभागप्रमुख सोडले तर साडेबारानंतर शुकशुकाट होतो. डॉक्टर रुग्णाला चाचण्या-तपासण्या सांगतात; पण बहुतेकांचा रिपोर्ट दुसर्या दिवशी मिळतो. नेमके त्या दिवशी संबंधित डॉक्टर नसतात. अशा रुग्णांना थेट दुसर्या आठवड्यात यावे लागते. चाचणी महत्त्वाची असल्यास आणि रुग्ण गंभीर झाला, तर कुणाची जबाबदारी कुणाची, हा प्रश्न पडतो. अपंग प्रमाणपत्रांसाठीही दोन-तीन खेटे मारावे लागतात, असेही सूत्रांनी सांगितले. पुरेसे स्ट्रेचर-व्हीलचेअर नसल्याने रुग्णाला अंगाखांद्यावर नेण्याशिवाय पर्यायच नसतो.
कुठे गेले मेंदूशल्यचिकित्सक? : ओपीडीमध्ये आठवड्यातून एकदा मानद मेंदूविकारतज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) उपचारांसाठी येतात; पण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मानद मेंदूशल्यचिकित्सक (न्यूरोसर्जन) गायब झाले आहेत. त्यांच्या नावाची पाटी अजूनही झळकतेच आहे. ते जेव्हा कार्यरत होते, तेव्हाही घाटीमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली नसल्याचे समजते.
टर्न-की प्रोजेक्ट धूळ खात : अत्युच्च सेवेसाठी ‘नवजात शिशू अतिदक्षता विभाग’ व अपघातातील गंभीर जखमींवर उपचारासाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’चे 2009 मध्ये मोठय़ा थाटात उद्घाटन झाले. मात्र हे विभाग सुरूच झालेले नाहीत. सुमारे साडेपाच कोटींचा हा टर्न-की प्रोजेक्ट धूळ खात पडून आहे. व्हेंटि
कंपनीचा प्रतिसाद नाही
ओळख असेल तर घाटी. नाही तर माती; तपासण्या-प्रमाणपत्रांसाठी रुग्ण, नातेवाइकांना मारावे लागतात खेटे
साहित्य रुग्णांच्याच माथी
बहुतांश विभागांमध्ये अनेकांना खाटांअभावी फरशीवरच उपचार घ्यावे लागतात; शिवाय चार-पाच हजारांपर्यंतचे साहित्य बाहेरून आणल्याशिवाय शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. अस्थिव्यंग, शल्यचिकित्सा आदी विभागांत रुग्णांना उपचार-शस्त्रक्रियेसाठी नेहमीच महिनाभर प्रतीक्षा करावी लागते.
दोन्ही सीटी स्कॅन पुन्हा बंद
क्ष-किरण विभागातील साधे व 64 स्लाइस सीटी स्कॅन मशीन बंद पडले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे उपकरणे बंद पडल्याचे प्रशासनाने सोमवारी (25 मार्च) सांगितले असले तरी ही उपकरणे कधी सुरू होतील, याची शाश्वती नाही.
"मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने दोन्ही टर्न-की प्रोजेक्ट सुरू होऊ शकले नाहीत. प्रोजेक्ट पूर्ण करणारी एल अँड टी कंपनी चाचण्यांसाठी प्रतिसाद देत नसल्याने विद्युत विभागाकडून काम करून घेण्यात येत आहे."
- डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.