आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गरिबीला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रोशन गेट भागातील आजम कॉलनीत सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हुमेरा अब्दुल वाहेद (20) असे या युवतीचे नाव आहे. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे.

हुमेरा ही दुपारी घरात एकटीच होती. घरात कुणीही नसताना तिने छताच्या अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार तिच्या बहिणीच्या निदर्शनास आला. तिने या बाबत जिन्सी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हुमेराचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी)पाठवला. हुमेराचे वडील अब्दुल वाहेद हे रोशन गेट भागातील जमजम हॉटेलमध्ये कामाला आहेत. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले. मोठय़ा बहिणीचा विवाह झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी वाहेद कुटुंबीय आजम कॉलनीत राहण्यासाठी आले होते. हुमेरा लहान बहीण आणि वडिलांसोबत राहत होती. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली यमपुरे करीत आहेत.