आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Guardian Minister Babasaheb Thorat District Tour

औरंगाबादचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांची धावती बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. अहमदनगर जिल्ह्यातून ते मोटारीने आले. जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात जिल्ह्यातील पावसाची मंडळनिहाय आकडेवारी जाणून घेतली. सोबत नाष्टा केला आणि अवघ्या 25 मिनिटांत विमानतळाचा रस्ता धरला. ते आले, आकडे बघितले, नाष्टा केला नि गेले असेच या दौर्‍याचे चित्र ठरले.

थोरात यांचे दुपारी दीड वाजता मोटारीने आगमन नि सायंकाळी पाच वाजता विमानाने परत असा त्यांचा दौरा होता. मधल्या काळात ते महसूल विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेणार होते. त्यांचे 3.40 वाजता आगमन झाले. दहा मिनिटे त्यांनी निवेदने स्वीकारली आणि बैठक आटोपली.