औरंगाबाद - जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांनी फेटाळला. निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी १५ दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. सोमवारी प्रचार संपत असून, या निर्णयामुळे जैन यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. जळगाव घरकुल घोटाळा झाला तेव्हा जैन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री होते.