आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Historical Canal Issue , Divya Marathi

नहरीच्या काही भागातील पाणी मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध! कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हवामान, भौगोलिक परिस्थितीचे भान, दूरदृष्टी ठेवून चारशे वर्षांपूर्वी निर्माण केलेली नहर आजही मजबूत स्थितीत आहे. अवघ्या पाच कोटी रुपयांत नहरीचे उत्तम प्रकारे संवर्धन करता येईल. जतन केल्यास एक हजार वष्रे नहरीला काहीही होणार नाही, असा विश्वास पुणे येथील डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन रिसर्च इन्स्टिट्यूटचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे यांनी व्यक्त केला. नहरीच्या काही भागात तर मिनरल वॉटरपेक्षाही स्वच्छ पाणी आहे, असे उद्गार शिंदे यांनी काढले.

दिल्लीच्या नॅशनल म्युझियमचे सदस्य व पुरातत्त्व संशोधक पंकज कहाळेकर, कोरिया येथील व डेक्कन संस्थेमध्ये पीएचडी करत असलेले वाय.झेड. किम, एन्व्हॉयर्नमेंटल इन्स्टिट्यूटचे प्रा. पी.डी. साबळे, प्रा. शिंदे आणि सर्पमित्र रवी घाडगे पाटील यांनी रविवारी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत नहरीच्या मेनहोलमध्ये उतरून शंभर मीटरपर्यंत अंतर्गत पाहणी केली. याविषयी माहिती देताना प्रा. शिंदे म्हणाले, नहरीचे बांधकाम अतिशय मजबूत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केले आहे. लोक कचरा, घाण टाकत असल्याने काही ठिकाणी पाणी दूषित झाले आहे. तर काही ठिकाणी हेच पाणी मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध आहे. काही भागाची क्षारांमुळे झीज होत आहे. ती टिकावी यासाठी डेक्कन कॉलेजचे तज्ज्ञ, नॅशनल म्युझियम संस्था, पुरातत्त्व संशोधक सहकार्यासाठी तयार आहेत. सर्वेक्षण अहवाल मनपा, राज्य व केंद्र शासनाला सादर करण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
कोरियातील धर्तीवर नहरीचा अभ्यास
कोरियात मोठय़ा प्रमाणात नहरी आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी तेथील लोक जागृत आहेत. नहर-ए- अंबरी पाहून आश्चर्यचकित झालो. नहरीचे बांधकाम आणि विशिष्ट अंतरावरील मेनहोल अप्रतिम आहेत. कोरिया व नहर-ए-अंबरीचा तुलनात्मक अभ्यास करून याची माहिती तेथील सरकार व नागरिकांना देईन. वाय. झेड. किम., कोरियन संशोधक