आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून बारावीची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. औरंगाबाद विभागातून 322 केंद्रांवर एक लाख 18 हजार 975 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज असून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, तामिळ, पंजाबी, सिंधी, बंगाली विषयाचे पेपर होतील, तर 3 ते 6 या दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, पाली या विषयांचे पेपर होतील. औरंगाबादमधील 104 केंद्रांवर 44, 341 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक तालुक्यात तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांचे एक विशेष पथक राहणार असून हे पथक महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे. शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतरचे शिक्षणाधिकारी, प्राचार्य प्रशिक्षण संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून हे पथक कॉपीमुक्तीसाठी काम करेल. महाविद्यालयीन पातळीवर दक्षता समितीदेखील राहणार असल्याचे बोर्डाचे सचिव प्र. श. पठारे यांनी सांगितले. दरम्यान, यंदाच्या बारावी परीक्षेवर बहिष्काराचे सावट कायम आहे.
एकीकडे मुख्याध्यापक संघटनेने परीक्षेनंतर उत्तरपत्रिका स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे मागण्या मान्य करण्याचा आदेश देऊनही सूचना न पाळल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.