आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे लघुउद्योजक आदिवासी भागातील मिलिंद घोडके यांनी मोडली चीनची मक्तेदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: कितीही महागडी गाडी असो, आजकाल हॉटेलच्या गेटवर तिची वेगळी तपासणी करणारा सुरक्षा रक्षक अडवतो तेव्हा अपमानाची भावना होते. मात्र चीनमध्ये सुरक्षा तपासणीचे काम गेटच करते. त्यातील कॅमेरा सर्व नोंदी करतो. तीच यंत्रणा असणारे रिट्रेकेबल गेट वाळूज येथील लघुउद्योजक मिलिंद घोडके यांनी तयार केले आहे. 
 
नंदुरबारसारख्या आदिवासी भागातील मिलिंद घोडके या तरुणाचे शिक्षण फक्त दहावी. पण त्यांनी अनुभवाने रोबोटिक तंत्रज्ञानावर पकड निर्माण केली. बीएमडब्ल्यू, होंडासारख्या कंपन्यांना त्यांनी काही स्पेशल पर्पज मशीन तयार करून दिल्या आहेत. त्यांनी स्मार्ट गेट तयार केले आहे.
 सहा ते आठ मीटर लांब असणारे हे गेट कुठेही लावणे शक्य आहे. गेटवर माणूस नसला तरीही ते ऑटोमॅटिक पद्धतीने उघडते, बंद होते. संगणकीय प्रणालीवर चालणारे हे गेट स्टील आणि अॅल्युमिनियमचा वापर करून बनवले आहे. ते फक्त चीनमध्ये तयार होते. भारतात येईपर्यंत ते दोन लाखांनी महाग होते. आता या गेटचे उत्पादन वाळूज येथीळ घोडके यांच्या आदिनाथ इंडस्ट्रीत केले जाते. 
 
भारतात प्रथमच : भारतात प्रथमच हे गेट तयार करण्याचा मान घोडके यांनी मिळवला आहे. याला रिट्रेकेबल गेट असे नाव देण्यात आले आहे. अवघ्या महिनाभरात दिवसरात्र काम करून हे जागतिक दर्जाचे गेट अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार केले. त्यांनी चीनची मक्तेदारी मोडीत काढली आहे. 
 
असे तयार केले माणसाला ओळखणारे गेट : घोडकेयांचे शिक्षण कमी असले तरी त्यांचा अभ्यास अन् अनुभव प्रचंड आहे. केवळ इंटरनेटवरून चीन येथील या स्वयंचलित गेटचा अभ्यास केला अन् महिनाभरात ते वाळूजच्या कारखान्यात तयार केले. 
 
किंमत चीनपेक्षा दीड लाखाने कमी 
या गेटला रिट्रेकेबल गेट म्हणतात. हे गेट चीनमध्ये तयार होते. त्याची किंमत पाच ते साडेपाच लाख रुपये आहे. हेच गेट प्रथमच घोडके यांनी वाळूजच्या कारखान्यात तयार केले तेही चीनपेक्षा दीड लाखाने स्वस्त. 
 
...तर गेटवर अडवणूक नाही 
कंपनीच्या गेटवर मालक किंवा कर्मचाऱ्यांची माहिती आणि गाडीचे स्कॅनिंग झाले की ते गेट त्यांना अडवणार नाही. गेटच्या समोरच्या बाजूला इंजिनसारखा डबा आहे. त्यात कॅमेरा आहे. तो चालकाच्या फोटोसह गाडीचे स्कॅनिंग करतो. 
 
बातम्या आणखी आहेत...