आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरत्या आठवड्यात औरंगाबादकरांची 25 कोटींनी चांदी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शेअर बाजारातील तेजीचा पतंग भरारी घेत असल्याने सरत्या आठवड्यात औरंगाबादच्या गुंतवणूकदारांना घसघशीत परताव्याच्या रूपाने तिळगुळाचा गोडवा चाखायला मिळाला. शहरातील गुंतवणूकदारांना एकाच आठवड्यात सुमारे 25 कोटींचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परदेशी शेअर बाजारातील सकारात्मक परिस्थिती, परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्याने वाढणारी गुंतवणूक आणि आयटी व बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांची चमकदार कामगिरी यामुळे बाजाराचा वारू वेगात आहे. त्यामुळे डाऊनचा शिक्का बसलेल्या मार्केटने पुन्हा एकदा नव्या जोमाने रिटर्न देण्याची चाल घेतली आहे.

बॅँकिंग, आयटी कंपन्यांची घोडदौड; शेअर बाजारात तेजी
बँकिंग, आयटी कंपन्या रेसमध्ये
आयसीआयसीआय, स्टेट बँक, अ‍ॅक्सीस बँक टॉप गेनर्सच्या यादीत असून विप्रो आणि इतर आयटी सेक्टरमधील कंपन्यांची सुस्थिती.

रिलायन्सचे बायबॅक
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात घट आली असली तरी रिटर्न्स न देऊ शकलेले शेअर्स कंपनीने बायबॅक करण्याची घोषणा केल्याने मार्केटमध्ये उत्साह.
व्याजदरात घट होण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेने व्याजदर घटवण्याचे संकेत दिल्यानेही तेजी आली. त्यामुळे तज्ज्ञांचा मार्केट डाऊन होण्याचा अंदाज या आठवड्यात खोटा ठरला.
डॉलर घसरला
डॉलरची घसरण सुरू झाल्याने चित्र पालटले. काही दिवसात डॉलर 4.50 रुपयांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास दुणावला. गुंतवणूकही वाढली.
यूएस मार्केटचे बॅकअप
यूएस मार्केटमधून भांडवलाचा वाढता ओघ, हाँगकाँग, जपान, चीन मार्केट वधारल्याचे सकारात्मक चित्र याचा निफ्टी, सेन्सेक्सला चांगला फ ायदा झाला.
गुंतवणूकदारांनी फायदा घ्यावा
नव्या वर्षात बाजारात तेजीचे वारे असून सकारात्मक बातम्या येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करावे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेऊन गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
विश्वनाथ बोदडे, एरिया हेड, आयएफसीआय