आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोडवर पुलांच्या 5 कमानी; पुलांमुळे होणार मुख्य रस्त्याचे तुकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जालना रोडवर आणखी तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्यामुळे हा पाच मोठय़ा कमानींचा रस्ता ठरणार आहे. विमानतळ ते महावीर चौक या 11 किमी अंतरात पाच उड्डाणपूल उभारण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण ठरणार असले तरी उड्डाणपुलांचे वावडे असलेले कित्येक वाहनचालक पुलाखालील मार्गांचाच वापर करीत असल्याने वाहतुकीची गुंतागुंत कायम राहण्याची शक्यता आहे.
नागपूर, अहमदनगर, पुणे, धुळे या जिल्ह्यांतून येणारी वाहने जालना रोडवरच पोहोचतात. याशिवाय शहरातील सिडको-हडको, मुकुंदवाडी आणि अन्य उपनगरांतील नागरिकांना शहरात जायचे असेल, तर जालना रोड हा एकमेव पर्याय आहे. शहराची लोकसंख्या, वाहनसंख्या झपाट्याने वाढल्याने हा रस्ता अत्यंत धोकादायक आणि अपघातांना निमंत्रण देणाराच ठरला आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सेव्हन हिल्स आणि त्यानंतर क्रांती चौकात उड्डाणपूल उभारले. मात्र, हे पूल वाहतुकीची कोंडी सोडवण्यास कमी पडत आहेत. बहुतांश वाहने पुलाखालील रस्त्याने जाणे पसंत करतात.
अशी असेल पुलांची रचना..
>1सानिया मोटर्ससमोरून सुरू होणारा पूल थेट वसंतराव नाईक कॉलेजसमोर संपेल. सर्वाधिक लांबीचा म्हणजे एक कि.मी.चा हा पूल राहील. 25 मीटर अंतरावर प्रत्येकी एक खांब, अशी रचना आहे.
>मोंढा नाका भागातील गुरुद्वारा कमानीपासून सुरू होणारा दुसरा पूल कुशल मंगल कार्यालयापर्यंत असेल, तर बाबा पेट्रोलपंप पूल कामगार आयुक्तालय ते पंचवटी चौकापर्यंत उभारण्यात येईल.
सिडको चौकातील पूल सर्वात लांब
सर्व तांत्रिक बाबी तपासूनच नवे डिझाइन तयार करण्यात आल्याने पुलाखालील पूर्ण जागा मोकळी राहणार आहे. सिडको चौकातील पूल सर्वात मोठय़ा लांबीचा असून दोन चौक व्यापणारा आहे.
-एस. एस. जाधव, उपअभियंता, एमएसआरडीसी.