आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आली तरीही काँग्रेसला उमेदवार सापडेना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या 19 ऑगस्टला होणार्‍या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असले तरी काँग्रेस आघाडीचा उमेदवार निश्चित होऊ शकला नाही.

आपल्याच शागिर्दाला डोक्यावर र्शेष्ठींचा ‘हात’ राहावा यासाठी सोमवारी (29 जूलै) मुंबईत झालेल्या बैठकीत दोन माजी मुख्यमंत्री, एक विद्यमान मंत्री आणि एक माजी राज्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. पक्षानेही खेळी करीत इच्छुकांपैकी तिघांना ग्रीन सिग्नल दिला असून शेवटच्या दिवशी अधिकृत उमेदवारास एबीसी फॉर्म देवून इतर दोघांना अर्ज परत घेण्याचे आदेश बजावून प्रतिस्पध्र्यांवर मात करण्याचा डाव रचल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे आठ दिवसांपूर्वीच शिवसेनेने विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांची उमेदवारी जाहीर होऊन चार दिवस उलटूनही त्यांनी अर्ज दाखल केलेला नाही. प्रतिस्पध्र्यांना मात देण्यासाठी 1 ऑगस्टऐवजी मंगळवारी (30 जुलै) रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सध्या तीन नावे नजरेसमोर आहेत.

काँग्रेस इच्छुकांनी घेतले अर्ज : कॉँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्यापैकी अँड. सय्यद अक्रम, दिनेश परदेशी, अब्दुल हाफीज, जितसिंग करकोटक आणि बाबूराव कुलकर्णी यांच्यासाठी अर्ज घेण्यात आले आहेत. आतापर्यंत 20 अर्जांचे वितरण झाले असून सोमवारी दुपारपर्यंत एकही अर्ज सादर झाला नव्हता. कॉग्रेसच्या तीन उमेदवारापैकी एकाने र्शेष्ठींच्या सूचनेनुसार अर्जच खरेदी न केल्याने विरोधकांनीही उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केलेला नाही.

उमेदवारीसाठी ही अनामत
भारतीय नागरिक, मतदार यादीत नाव असलेली व्यक्ती अर्ज भरू शकते. या मतदारसंघातील 10 मतदार सूचक-अनुमोदक म्हणून लागतात. मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी अडीच तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम आहे.

31 जुलैपर्यंत उमेदवार ठरेल
उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत बैठका सुरू आहेत. 31 जुलैपर्यंत उमेदवार ठरेल, असे सांगण्यात येते. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. माझे सहकारीही मुंबईत आहेत.अँड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँ.

आघाडीतील ‘दुसर्‍या’वर तनवाणींची नजर

काँग्रेसकडून कोण उमेदवार येतो, कोणी अपक्ष म्हणून रिंगणात येतो काय, याची प्रतीक्षा किशनचंद तनवाणी यांना आहे. त्यामुळेच त्यांनी अजूनही पत्ते पिसण्यास सुरुवात केली नाही. काँग्रेस आघाडीकडून दुसरा उमेदवार मैदानात आला तरच विजय मिळणार, सरळ लढत झाल्यास विजय दृष्टिक्षेपात नाही, याची त्यांना जाणीव आहे.

असे आहे निवडणुकीचे चित्र
जालना
171 सदस्य जालना जिल्ह्यातील

औरंगाबाद
300 सदस्य औरंगाबाद जिल्ह्यातील

काँग्रेसची दोन मते कमी

या मतदारसंघात एकूण 473 मते होती. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाहिदाबानो पठाण यांचे सदस्यत्व रद्द झाले, तर जालन्याच्या एका नगरसेवकाने राजीनामा दिल्याने दोन मते कमी झाल्याने आता 471 मतदान आहे. नाहिदा यांनी 1 ऑगस्टपूर्वी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली तर त्या मतदान करू शकतील. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या क्षणी मतदारांची यादी अंतिम होते.

नेते आणि त्यांनी पुढे केलेले उमेदवार

0शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार - सुभाष झांबड (गतवेळचे अपक्ष उमेदवार)

0अशोक चव्हाण- बाबूराव कुलकर्णी (माजी नगराध्यक्ष, अंबड)

0नारायण राणे- प्रमोद राठोड (पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते)

असे आहे बलाबल

काँग्रेस- 144

राष्ट्रवादी- 81

शिवसेना- 94

भाजप- 51

लोकभारती- 2

आमदार प्रशांत बंब आघाडी- 8

मनसे- 12

अपक्ष- 32

भारिप- 2

रिपाइं- 2

शहर प्रगती आघाडी- 3

नगर विकास आघाडी- 11

बसपा- 1

स्वीकृत सदस्य- 28

एकूण- 471