आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत कामगारांनी केली औरंगाबाद-जालना रेल्वेस्थानकांची सफाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्था व दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद व जालना येथे रेल्वे परिसर स्वच्छता व व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात आले.

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी आठपासून गाडगेबाबांच्या वेशभूषेत खंडुजी गायकवाड, शाहीर भीमसिंग शिरे, शाहीर लक्ष्मण मोकासरे, विनायक चव्हाण, मारुती आवलगावे, अंबादास वाघचौरे, पंढरीनाथ वेरुळे व जयंत बडवे यांनी झाडू घेऊन रेल्वे परिसर स्वच्छ केला. या वेळी स्टेशन प्रबंधक अशोक निकम, विजय दुबे, वाय.एम.मोटे पाटील, गुणवंत विकास संस्थेचे अध्यक्ष स.सो.खंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छता अभियानातील सदस्यांनी रेल्वेचे डबेही साफ केले. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी पत्रके प्रवाशांना वाटप करण्यात आली. यादरम्यान करमाड येथे रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे प्रबोधन करत स्टेशन परिसरात स्वच्छ केला. रेल्वेत घाण व धूम्रपान करणार्‍या प्रवाशांना गांधीगिरी करत गुलाब पुष्प देऊन व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. या वेळी रामभाऊ निकाळजे यांनी जादूचे प्रयोग करून अंधर्शद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. जालना येथे स्टेशन प्रबंधक विजयसिंह वळवी यांनी या अभियानाचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी या वेळी विश्वनाथ जांभळे, प्रवीण बोर्डे, भागवत मानवतकर, उत्तम आसबे, शिवाजी आपटे, जगन्नाथ कोळी, मुकुंद कोकणे, नितीन सिंदवाडकर, आशा मोरे, सुरेखा बनसोडकर, पंडितराव तुपे, अशोक सोनवणे, सतीश वेद, रमेश तारापुरे, लक्ष्मण काळे, राजेंद्र पोळ, माधव केदार, हेमंत दाभाडे, संतोष पापडीवाल, उद्धव करडखेले, वाल्मीक जाधव, गंगाधर थोरात, गोविंद डांगे, डॉ.भास्कर रेंगे, राजू डोईफोडे, मच्छिंद्र फुलावरे, लक्ष्मण काळे, मधुकर ढिलपे, दिलीप आसबे आदींनी पर्शिम घेतले.