आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad Jalna Sthanik Swarajy Sanstha Election Subhash Zambad Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोघेही घनिष्ठ मित्र; एकाचा विजय तर दुसरा पराजित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘मी अशिक्षित आहे, पसंती क्रमांकांचे मत मला नोंदवता येणार नाही’ असे कारण पुढे करून औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य मिळून 19 जणांनी मदतनीस घेतला होता. मात्र, मतपेट्या उघडल्या तेव्हा आपल्याकडे अनेकजण बहुभाषिक असल्याचे दिसून आले. यातील काहींनी थेट उडिया भाषेत मत नोंदवले होते. मत नोंदवण्याची ही पद्धत म्हणजे संकेत असल्याची चर्चा होती.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची बुधवारी मतमोजणी झाली तेव्हा या दोन जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींना मराठी, इंग्रजीबरोबरच उडिया, तेलगू तसेच कानडी या भाषा अवगत असल्याचे दिसून आले. कारण 6 जणांनी उडिया, तेलगू तसेच कानडी भाषेतून मते नोंदवली होती. मान्यता असलेल्या देशातील 22 भाषांतून मतदान करण्याची मुभा असल्यामुळे या मतदारांनी अवगत भाषांचा वापर केला. त्यामुळे त्यांची मते वैध ठरवण्यात आली असली तरी कोणाला मतदान केले हे समजावे यासाठी वापरलेली ही क्लृप्ती असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. विशेष म्हणजे आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड आणि युतीचे किशनचंद तनवाणी या दोघांनाही मराठी तसेच इंग्रजी भाषेशिवाय अन्य भाषांत क्रमांक नोंदवलेली मते मिळाली आहेत. 22 भाषांत मतदान करण्याचा अधिकार असल्याने जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही मते वैध ठरवली. अर्थात तसे उमेदवार व मतदारांना माहिती होते.