आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: घरे न तोडता जयभवानीनगरातून पावसाच्या पाण्याचा प्रवाह काढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: जय भवानी नगरात नाल्यांवर घरे बांधल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला आहे. त्यामुळे येथे अनेक घरांत पाणी शिरते. हा प्रवाह मोकळा करण्यात यावा, यासाठी येथील नगरसेविका मनीषा मुंडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रवाह मोकळा करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर घरे तोडावी लागतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच नगरसेवकच घरे तोडण्याचे सांगत असल्याचे मुद्दाम सांगितले जाते. परंतु येथून भूमिगतची गटार नेणे असो वा प्रवाह मोकळा करणे यासाठी घरे तोडण्याची गरज नाही. कमीत कमी पाडापाडीत प्रवाह मोकळा केला जाऊ शकतो, असे राजू वैद्य यांनी स्पष्ट केले आणि तशी मागणीही केली. त्यामुळे जयभवानीनगरात कमीत कमी पाडापाडीत प्रवाह मोकळा करावा, असे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. 
 
नगरसेविका मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. नुकत्याच झालेल्या पावसात येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे नगरसेवकच घर पाडण्याच्या मागे लागत असल्याचे मुद्दाम नागरिकांना सांगितले जाते, असा आरोपही त्यांनी केला. या वॉर्डातील नागरिक गरीब आहेत. त्यांना उलटेच सांगण्यात येत असल्यामुळे ते विरोध करत असल्याचे मुंडे म्हणाल्या. त्यावर घरे पाडण्याचा आग्रह कशासाठी, असा सवाल वैद्य यांनी केला. घरे पाडताही पाण्याचा प्रवाह मोकळा केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रशासनाने फक्त योग्य नियोजन करायला हवे. त्यानुसार येथील घरे पाडता फक्त नाल्याचा प्रवाह मोकळा करावा, असे बारवाल यांनी स्पष्ट केले. 
 
रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा 
पालिकेतगत महिन्यात मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील काही जण नव्या जागेवर रुजू झाले नाहीत. नगर रचना विभागातील उपअभियंता जयंत खरवडकर का रुजू झाले नाहीत, असा सवाल सय्यद मतीन यांनी केला होता. त्याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या वतीने अय्युब खान यांनी सांगितले. त्यामुळे पुढील बैठकीपर्यंत नव्या जागी किती जण रुजू झाले नाहीत, याची माहिती सभागृहाला द्यावी अन् मुद्दाम बदलीच्या ठिकाणी रुजू होणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे बारवाल म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...